Mumbai sakal
मुंबई

ठाणे पालिकेतील ४९ कर्मचाऱ्यांचे भवितव्य टांगणीला

बनावट जातवैधता प्रमाणपत्राद्वारे नोकरी

सकाळ वृत्तसेवा

ठाणे : ठाणे (Thane) महापालिकेच्या सेवेत बनावट जातवैधता प्रमाणपत्र सादर करत ४९ जणांनी नोकऱ्या लाटल्याची बाब समोर आली आहे. या मध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते कनिष्ठ कर्मचाऱ्यांचा समावेश असून ते सर्वजण आजही सेवेत कार्यरत आहेत.

यासंदर्भातील प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला असून शासनाकडून सूचना आल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता पालिकेतील अधिकान्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. ठाणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांनी बनावट जातवैधता प्रमाणपत्र सादर करून नोकरी मिळवल्याचा प्रकार नुकताच समोर आले. एका प्रकरणाच्या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने अशा प्रकारे फसवणूक करून नोकरी लाटणाऱ्या कर्मचाऱ्यांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यासह त्यांना सेवेतून कमी करण्याचे निर्देश दिले होते.

त्यानुसार संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई होणे अपेक्षित असताना ते अद्यापही सेवेत असल्याचेही उघड झाले. तसेच काही कर्मचारी आपली सेवा पूर्ण करून निवृत्तही झाले आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर कोणती कारवाई करणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्य सरकारचा निर्णय! स्वस्त धान्य दुकानांत मिळणार रॉकेल; इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर तातडीने हाेणार वितरण..

Chhatrapati Sambhajinagar News: २०४ वर्षांची परंपरा जपणारी माळीवाड्यातील ‘काटेरी फास’ यात्रा; श्रद्धेचा थरार अनुभव

Datta Meghe Passes Away : विदर्भाचा बुलंद आवाज हरपला ! माजी मंत्री दत्ता मेघे यांचे निधन, ८९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Guru Krupa importance: गुरुकृपा, श्रद्धेमुळे आध्यात्मिक प्रवास सुलभ; साधना करत अहंकार कमी करण्याचा श्री एम यांचा सल्ला!

आरोग्य विभागाचा निर्णय! राज्यात ७०० ठिकाणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना; नगरसेवक होणार जनआरोग्य समितीचे अध्यक्ष, वाचा...

SCROLL FOR NEXT