मुंबई

मुंबई: रेल्वे रुळावर आत्महत्या करण्यासाठी तो झोपला होता पण...

कुलदीप घायवाट

मुंबई: मध्य रेल्वे मार्गावर (central railway) रेल्वे रूळावर झोपून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीचे प्राण मोटरमनने वाचवले. लोकल थांबवून त्याने जीव वाचवला. मोटरमनने (motorman) त्या व्यक्तीचं मनपरिवर्तन करून रेल्वे रूळावरून हटवलं. मोटरमनच्या सतर्कतेमुळे व्यक्तीचा जीव वाचल्याने मोटरमनचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येणार आहे. (the person who want to do suicide Central railway motorman save his life)

मध्य रेल्वे मार्गावर शनिवारी सीएसएमटीहून लोकल दुपारी 2.12 वाजता पनवेल करीता सुटली. या लोकलवर कर्तव्यावर मोटरमन पी.के.रत्नाकर होते. लोकल टिळक नगर ते चेंबूर दरम्यान एक व्यक्ती रुळावर झोपून राहिलेली आढळली. टिळक नगर-चेंबूर विभागात न्यूट्रल सेक्शनमध्ये लोकल असल्याने लोकलचा वेग कमी होता. त्यामुळे रत्नाकर यांनी क्षणाचाही विचार न करता तातडीने ब्रेक लावून ट्रॅकवर असलेल्या व्यक्तीपासून अवघ्या 10-12 मीटर अंतरावर लोकल थांबविली. लोकलमधील प्रवाशांनी त्या व्यक्तीला ट्रॅकवरून सुरक्षित ठिकाणी नेण्यास मोटरमनला मदत केली.

मोटरमन रत्नाकर यांच्या क्षणात घेतलेल्या निर्णयाने दुर्घटना टळली. त्यांनी केलेले काम अत्यंत कौतुकास्पद आहे. लोकल ट्रेनच्या गार्डकडूनही कंट्रोलला याची माहिती देण्यात आली. मोटरमनचा सावधपणा आणि वेळेवर तसेच त्वरित केलेल्या कारवाईमुळे एकाचा जीव वाचला. त्यांना योग्य पुरस्कार देण्यात येईल, असे मध्य रेल्वे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Opening: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजाराची जोरदार सुरुवात; निफ्टी नवीन विक्रमी उच्चांकावर

Covaxin: कोव्हिशिल्डच्या गोंधळानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा मोठा दावा, वाचा काय म्हणाली कंपनी

Crude Oil Prices: पेट्रोल-डिझेलचे दर होणार कमी! कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये मोठी घट

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

T20 World Cup: टीम इंडियात ४ फिरकी गोलंदाज का घेतले? कर्णधार रोहित शर्माने दिलं स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT