Mumbai Rode sakal
मुंबई

Mumbai Rode: ऐन पावसाळ्यात मुंबईकरांचे हाल, अद्याप १२३ कामे सुरूच

यंदा रस्तेकामाचा खेळखंडोबा झाला असून मुंबईकरांना खड्ड्यांच्या विघ्नाला सामोरे जावे लागणार आहे |This year, the road works have become hectic and Mumbaikars will have to face the problem of potholes

सकाळ वृत्तसेवा

Mumbai News: पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची कामे करायची आहेत; मात्र मुंबईत ३९७ किमी अंतरातील ९१० रस्त्यांच्या कामांपैकी आतापर्यंत १२३ कामे सुरू आहेत.

मात्र ती कामेही पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे यंदा रस्तेकामाचा खेळखंडोबा झाला असून मुंबईकरांना खड्ड्यांच्या विघ्नाला सामोरे जावे लागणार आहे.(BMC Rode News)

मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्याची घोषणा यंदा करण्यात आली. त्यासाठी सिमेंट काँक्रीटचे रस्ते करण्याची घोषणाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. त्यामुळे पालिका प्रशासनाला सिमेंट काँक्रीटची कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले. त्यानंतर सहा हजार कोटींचे टेंडरही देण्यात आले; मात्र मुंबईत ३९७ किमी अंतरातील ९१० रस्त्यांच्या कामांपैकी आतापर्यंत १२३ कामे सुरू झाली आहेत; तर उर्वरित ७८७ कामांना अद्याप सुरुवात झालेली नाही.(mumbai municipal corporation)

पावसाळा अवघा एक महिन्यावर आला आहे. त्यामुळे महिन्यात रस्त्यांची कामे होऊ शकणार नाहीत. त्यामुळे मुंबईकरांना पावसाळ्यात पुन्हा खड्ड्यांचा त्रास सोसावा लागणार आहे. गेल्या काही वर्षांत रस्त्यातील खड्डे हा विषय पालिकेत आणि विधिमंडळातही गाजला. त्यातच आता लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्याने रस्त्यांचा विषय विरोधकांना मिळाला आहे.(mumbai rode construction)

पश्चिम उपनगरातील खड्डे भरण्यासाठी तरतूद

पश्चिम उपनगरांतील झोन-३ मधील एच पूर्व, एच पश्चिम वांद्रे आणि के पूर्व अंधेरी वॉर्डामध्ये म्हणजे वांद्रे ते मालाड-गोरेगावपर्यंतच्या रस्त्यांवरील खड्डे, बॅडपॅच भरण्याची कामे हाती घेतली जाणार आहेत. या कामावर सुमारे ५० कोटींचा खर्च केला जाणार असल्याचे पालिकेच्या सूत्रांनी सांगितले.(malad goreraon rode)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijit Deepke: महायुतीचे नेते अभिजीत दीपकेंचे फॅन; भेटीसाठी गर्दी, आंदोलनाच्या भूमिकेचे कौतुक करत सुरक्षेचीही मागणी

Latest Marathi News Live Update : बाळापूर तालुक्यातील मन, निर्गुणासह महेश या तिन्ही नद्यांना मोठा पूर; धोक्याची पातळी ओलांडली

Radhanagari Dam Gate Opened : राधानगरी धरण 100 टक्के भरले! मध्यरात्री 6 क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा उघडला; भोगावती नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा

वर्षा ऋतू आणि वातदोषांचे संतुलन

Bhiwandi Building Collapse : भिवंडीत भीषण दुर्घटना! चार मजली इमारत कोसळली, एकाचा मृत्यू; ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची भीती

SCROLL FOR NEXT