Mumbai Sakal
मुंबई

देशातील पहिले ‘पॉड हॉटेल’ मुंबई सेंट्रल येथे उभारणार

‘आयआरसीटीसी’ च्या वतीने पॉड हॉटेलची निर्मिती केली जात आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : प्रवाशांना (Passenger) तात्पुरत्या (Temporary) निवासासाठी ‘पॉड हॉटेल’ (Pod Hotel) उभे करण्याची संकल्पना (Idea) मांडण्यात आली होती; मात्र निविदा प्रक्रियेत दिरंगाई, कोरोना काळात (Corona Period) ठप्प झालेल्या कामांमुळे पॉड हॉटेल (Pod Hotel) उभे करण्यास अडचणी आल्या; मात्र आता पुन्हा कामाला सुरुवात (Start) झाली आहे. सप्टेंबर (September) अखेर मुंबई सेंट्रल (Mumbai Central) येथे देशातील पहिले ‘पॉड हॉटेल’ (Pod Hotel) उभे राहणार आहे.

‘आयआरसीटीसी’च्या वतीने पॉड हॉटेलची निर्मिती केली जात आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांतून प्रवास केल्यानंतर वा उपनगरीय रेल्वे प्रवास करणाऱ्यांना तात्पुरत्या निवासाची सोय येथे होणार आहे. कमी खर्चात आणि कमी जागेत आधुनिक डिझाईनचे पॉड हॉटेल बनवले जात आहे. सध्या या पॉड हॉटेलची तांत्रिक कामे, बांधकामे सुरू आहेत. या रूममध्ये अनेक जीवनावश्यक गरजेसह आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा मिळणार आहेत. या रूममध्ये प्रवाशांना कमाल १२ तासांची विश्रांती करता येणार आहे. आयआरसीटीसीकडून अशा ३० पॉड (रूम)ची उभारणी करण्यात येणार आहे. या कामासाठी अंदाजे एक कोटी ८० लाखांचा खर्च अपेक्षित आहे.

सुसज्ज, कमी जागा

पॉडची सर्वप्रथम संकल्पना जपान देशात मांडण्यात आली. जपानने येथील प्रवाशांना, कर्मचाऱ्यांना झोपण्यासाठी, विश्रांतीसाठी जागा मिळावी, यासाठी पॉडची निर्मिती करण्यात आली. पॉड हॉटेलमध्ये वायफाय, यूएसबी पोर्ट, टीव्ही, वातानुकूलन यंत्रणा असेल. हवेशीर जागा, डिझाईन असलेल्या नक्षी, सरकते दरवाजे, स्मोक डिटेक्टर अशा सुविधा असतील, अशी माहिती आयआरसीटीसी, पश्चिम क्षेत्राचे जनसंपर्क अधिकारी पिनाकिन मोरावाला यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT