मुंबई

Railway: मध्य रेल्वेने कसली कंबर; १००हुन अधिक तिकीट दलालांना केली अटक

Chinmay Jagtap

लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालांना पकडण्याकरिता मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील आरपीएफ पोलिसांनी कंबर कसली आहे. आठ महिन्यांत रेल्वे सुरक्षा दलाने एकूण १२८ दलालांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून ६४ लाख ६१ हजार रुपयांची २८५० तिकिटे जप्त करण्यात आली आहेत.

गेल्या महिन्यात रेल्वे तिकिटांची अवैध विक्री करणाऱ्यांवर दहा गुन्हे नोंदवण्यात आले असून या कारवाईत आरपीएफने तीन लाख ७८ हजारांची १७९ ई-तिकिटे जप्त केली आहेत.
अनधिकृत दलालांकडून लांब पल्ल्याच्या गाड्यांचे मोठ्या प्रमाणात आरक्षण केले जाते. त्यामुळे सामान्य प्रवाशाला तिकीट उपलब्ध होत नाही.

तात्काळ तिकीट मिळवण्यासाठी खिडक्यांसमोर एकापेक्षा जास्त दलाल उभे केले जातात. त्यामुळे प्रवाशांना तिकीट मिळत नाही. इतर पर्याय उपलब्ध नसल्याने प्रवासी दलालांचा आधार घेतात. त्याची दखल घेत मध्य रेल्वेच्या आरपीएफ पोलिसांनी दलालांविरोधात मोठी कारवाई सुरू केली आहे.

एप्रिल ते नोव्हेंबर २०२३ दरम्यान रेल्वे कायद्याच्या कलम १४३ अन्वये तिकीट दलालीची १०७ प्रकरणे नोंदवण्यात आली. १२८ जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ६४ लाख ६१ हजार २०३ रुपये किमतीची एकूण २८५० तिकिटे जप्त करण्यात आली.

मुंबई विभागातील आरपीएफ पोलिसांनी नोव्हेंबर २०२३ मध्ये रेल्वे दलालीच्या एकूण दहा प्रकरणांचा छडा लावत ११ जणांना अटक केली. दलालांकडून ३,७८,७४७ रुपये किमतीची १७९ तिकिटे जप्त करण्यात आल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Ambabai Temple : नवरात्रोत्सवाच्या धामधुमीत कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात नवा वाद; देवस्थान समितीविरोधात पुजारी आक्रमक; नेमका वाद काय?

SA vs AUS 1st Test: व्हॉट अ कॅच...! स्टीव्ह स्मिथची चतुराई अन् आफ्रिकन फलंदाजचा करेक्ट कार्यक्रम; ऑसी खेळाडूचा विश्वविक्रम Video

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचे खाते उघडले; संग्राम सोरटे विजयी

Nagpur EVM Training: आगामी निवडणुकीत ‘एस-३’ मतदान यंत्राचा वापर;नागपूर जिल्ह्याला तीन हजार कंट्रोल युनिट प्राप्त; कार्यपद्धतीचे प्रशिक्षण

पत्नीशी वडिलांचे अनैतिक संबंध असल्याचा संशय, ३२ वर्षीय मुलाने वडिलांना झोपेतच संपवलं; डोंबिवली हादरली

SCROLL FOR NEXT