Crime sakal
मुंबई

Mumbai Ahmedabad Highway : हटकल्याचा आला राग; भंगार चोरांनी टेम्पो अंगावर चढवून केला खून

Chinmay Jagtap

Mumbai Ahmedabad Highway : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील नांदगाव फाट्यावर चोरीचा माल भरलेल्या टेम्पोचालक आणि त्याच्या साथीदारांना हटकल्याचा राग आल्याने टेम्पो अंगावर चढवून एकाची हत्या करण्यात आली आहे. नांदगाव फाट्याजवळील विनोद ट्रेडर्ससमोर मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडली.

लोखंडी प्लेट भरलेला टेम्पो अंगावरून गेल्याने सुभाष सातवी याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर मनोर पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून चोरीचा माल भरलेला टेम्पोही जप्त केला आहे.

मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील नांदगाव फाट्यावरील विनोद ट्रेडर्स दुकानासमोर नीलेश वाघात, भावेश बसवत आणि आदित्य बसवत यांनी बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या लोखंडी प्लेट चोरून त्या टेम्पोमध्ये ठेवल्या होत्या. यादरम्यान विजय डवला, सुभाष सातवी यांनी टेम्पोबाबत संशय आल्याने टेम्पोतील तिघांना हटकले.

यावेळी चोरीच्या मालासह पकडले जाण्याच्या भीतीने नीलेश वाघात याने टेम्पो सुरू करून भरधाव वेगात नेला. यावेळी सुभाष सातवी याच्या अंगावरून टेम्पो गेल्याने तो गंभीर जखमी झाला. यावेळी आरोपी टेम्पो घेऊन मुंबईच्या दिशेने पसार झाले. दरम्यान, जखमी सुभाषला मनोरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यानंतर त्याला उपचारासाठी सुरत येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र बुधवारी सकाळी उपचारादरम्यान सुभाषचा मृत्यू झाला.

गुन्हा दाखल झाल्यानंतर मनोर पोलिसांनी वेगाने चक्रे फिरवून आरोपींना अटक करून टेम्पो जप्त केला आहे. गुरुवारी सकाळी तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सतीश शिवरकर यांनी दिली. आरोपींच्या ताब्यातील टेम्पो आढळलेल्या लोखंडी प्लेटबाबत चौकशी सुरू असल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zilla Parishad Election : आदेश आला ! जिल्हा परिषद-पंचायत समितीचा धुरळा उडणार, आचारसंहिता दोन दिवसात शक्य, निवडणूक आयोगाकडून जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Latest Marathi News Live Update : मुंबईचा महापौर ठाकरे बंधू ठरवतील : जयंत पाटील

Bigg Boss Marathi 6 Live Update: रितेश देशमुखच्या सहकलाकार अभिनेत्रीची 'बिग बॉस मराठी ६' च्या घरात एंट्री

Pune Crime : शेअर बाजाराच्या नावाने अडीच कोटींचा डल्ला! ट्रेडज इन्व्हेस्टमेंटच्या संचालकांना हैदराबाद विमानतळावर बेड्या

अभिनयाचा पडदा ते राजकारणाचं मैदान गाजवणारी दीपाली सय्यदची बिग बॉसमध्ये एंट्री !

SCROLL FOR NEXT