मुंबई

'तो' फेरीवाला पोलिसांकडून सुटेल, तेव्हा आमच्याकडून मार खाईल - राज ठाकरे

कोयत्याने हल्ला करुन महिला अधिकाऱ्याची बोटं छाटली.

दीनानाथ परब

मुंबई: अनधिकृत फेरीवाल्यांवर (vendor) कारवाई करणाऱ्या ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे (kalpita pimple) यांच्यावर काल फेरीवाल्याने हल्ला (assault) केला. यामध्ये त्या जखमी झाल्या आहेत. या घटनेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी आज आपल्या पत्रकार परिषदेत संताप व्यक्त केला. "पोलिसांकडून सुटेल त्या दिवशी आमच्याकडून मार खाईल. यांची मस्ती उतरवली पाहिजे. ज्यादिवशी यांची सर्व बोट छाटली जातील. फेरीवाला म्हणून फिरता येणार नाही. त्यादिवशी त्यांना समजले. निषेध करुन हे लोक सुधारणारे नाहीत" अशा शब्दात आपला संताप व्यक्त केला.

"यांची हिंमत ठेचली पाहिजे. शासकीय अधिकाऱ्यांची बोटं छाटता. आज पकडलं, उद्या बेल होईल. पुन्हा दुसऱ्यांची बोटं छाटायला बाहेर. हफ्ते वसुली सारखे प्रकार होऊ नयेत, यासाठी सरकारने बंधनं आणली पाहिजेत" असं राज म्हणाले.

"आजपर्यंत बोट छाटायची हिंमत कोणाची झाली नव्हती आणि हे बेल वरती सुटणार. सुटून बाहेर आल्यावर यांना भीती काय असते ते समजेल ? असे राज ठाकरे म्हणाले. अण्णा हजारे मंदिर उघडण्यासाठी शंखनाद आंदोलन करणार आहेत, या प्रश्नावर 'अण्णा कुठे होते इतके दिवस?' असा प्रतिप्रश्न केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyanesh Kumar Resignation Letter : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याचे पत्र व्हायरल; निवडणूक आयोगाने सांगितले सत्य

Electronics Prices: दसरा-दिवाळीपूर्वी ग्राहकांना मोठा धक्का; एसी, एलईडी, फ्रीज, वॉशिंग मशिनच्या किमती वाढणार

Kolhapur Politics: ठरावदारांच्या ओळख परेडवरून राडा; मंत्र्यांसमोरच वादावादी; राष्ट्रवादी-भाजप कार्यकर्ते धावले अंगावर

ST Bus: विद्यार्थ्यांची पायपीट थांबणार! दुर्गम भागात एसटीच्या १०० 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी' मिडी बस धावणार

Kolhapur News: माझ्यासाठी भरपूर केलंस, माफ कर’, पत्नीला मेसेज पाठवून संपवलं आयुष्य; सावकाराकडून जाच

SCROLL FOR NEXT