Railway News sakal
मुंबई

Railway News: पश्चिम रेल्वेच्या दक्षता पथकाने बनावट भरतीचे रॅकेट केले उद्ध्वस्त!

३०० पेक्षा जास्त उमेदवारांची २१ कोटी रुपयांची फसवणूक!

सकाळ वृत्तसेवा

रेल्वेमध्ये बोगस भरती करणाऱ्या टोळीच्या पर्दाफाश करण्यात पश्चिम रेल्वेच्या दक्षाता विभागाला यश आले असून रॅकेटमधील मुख्य आरोपीना अटक करण्यात आली आहे.

गेल्या अनेक दिवसांसापासून रेल्वे बोगस भरतीचे रॅकेट चालवून तरुणांकडून पैसे उकळण्याचे काम करत होते. आतापर्यंत या टोळीने ३०० पेक्षा अधिक उमेदवारांची सुमारे २१ कोटी रुपयांची फसवणूक केली असल्याची माहिती समोर आली आहे.

पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेतील बनावट भरती रॅकेटचा मुख्य सूत्रधार हरताली प्रसाद रोहिदास या आरोपीला पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला. बाहेरील व्यक्ती आणि दोन प्रॉक्सी उमेदवारांच्या मदतीने गुगल पे द्वारे २० हजार रुपये गुन्हेगाराला हस्तांतरित केले गेले.

उर्वरित हप्ता भरण्यासाठी रोहिदास यांना मुंबई सेंट्रल स्टेशनवर भेटण्याचा बेत आखण्यात आला. अखेरीस त्याला ०२ फेब्रुवारी २०२४ रोजी मुंबई सेंट्रल स्टेशनच्या पोर्चमधून सुमारे दुपारी २ वाजता सुमारास दक्षता पथकाने अटक केली आहे.

चौकशीत रोहिदासने एका उमेदवारासाठी ९ ते १० लाख रुपये घेतल्याचे उघड झाले. कोलकाता येथील एका व्यक्तीच्या मदतीने तो बनावट कागदपत्रे बनवत होता.

त्याच्या स्मार्ट फोनमध्ये एकूण १८० नंबूर ब्लॉक सापडले, बहुधा हे तेच लोक असावेत ज्यांनी रेल्वेत नोकरी मिळवण्यासाठी मोठी रक्कम भरली होती. टीमने सुमारे १२० लोकांच्या चॅट शोधून काढले जे त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यासाठी दिलेले पैसे परत मागत होते. भरती झालेल्या कर्मचाऱ्यांची सर्व बनावट कागदपत्रे, चॅट आणि व्हिडिओ जप्त करण्यात आली आहे.

आरोपीला मुंबई सेंट्रल लोहमार्ग पोलिसांकडे सोपवण्यात आले असून आयपीसी कलम ४२०, ४६५,४६८,४७० आणि ४७१ अंतर्गत एफआयआर नोंदविण्यात आली आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Coldrif Cough Syrup च्या दूषित बॅचवर बंदी! महाराष्ट्र एफडीएचा अलर्ट जारी, तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेल जाहीर

Crime: पक्षातील सदस्याला अडकवण्यासाठी घरात स्फोटके आणि दारू ठेवली, पण काँग्रेस नेता स्वत:च अडकला अन्...; काय घडलं?

दुर्दैवी घटना! 'सख्ख्या काकाच्या पिकअपखाली सापडून चिमुरड्याचा मृत्यू'; आंबेगाव तालुक्यातील घटना, कुटुंबीयांचा आक्रोश

INDW vs PAKW सामन्यात वाद! पाकिस्तानी फलंदाज विकेटनंतरही मैदान सोडेना, कर्णधाराचीही अंपायरसोबत चर्चा; भारताचं मात्र सेलिब्रेशन

INDW vs PAKW, Video: पाकिस्तानचा पोपट झाला! जेमिमाहला रोड्रिग्सच्या विकेटसाठी सेलीब्रेशन करत होते अन् अचानक...

SCROLL FOR NEXT