dombivli sakal
मुंबई

Dombivli : सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाने काढली महिलेची छेडछाड ; डोंबिवलीतील आजदेपाडा येथील घटना, तरुणाला स्थानिकांनी दिला चोप

डोंबिवलीत भर रस्त्यात कामावरून घरी परतणाऱ्या तरुणीशी लगट करण्याचा प्रयत्न करत तिची छेड काढल्याची घटना डोंबिवलीत गुरुवारी रात्री घडली आहे. छेड काढणाऱ्या तरुणाला स्थानिक तरुणांनी चांगलाच चोप दिला असून त्याला मानपाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. प्रीतम गायकवाड असे या तरुणाचे नाव असून तो सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा मुलगा असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली : डोंबिवलीत भर रस्त्यात कामावरून घरी परतणाऱ्या तरुणीशी लगट करण्याचा प्रयत्न करत तिची छेड काढल्याची घटना डोंबिवलीत गुरुवारी रात्री घडली आहे. छेड काढणाऱ्या तरुणाला स्थानिक तरुणांनी चांगलाच चोप दिला असून त्याला मानपाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. प्रीतम गायकवाड असे या तरुणाचे नाव असून तो सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा मुलगा असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

डोंबिवली आजदेपाडा परिसरात राहणारी एक महिला गुरुवारी रात्रीच्या सुमारास कामावरून घरी परतत होती. एक तरुण तिचा पाठलाग करत होता. अंधाराचा फायदा घेत या तरुणाने महिलेचा गळा पकडत तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. महिलेने प्रतिकार करत आरडा ओरड सुरू केला.

आरडा ओरड एकूण स्थानिक तरुणांनी धाव घेतली. स्थानिक येत असल्याचे समजताच तरुणाने पळ काढला. मात्र तरुणांनी त्याचा पाठलाग करत त्याला पकडून चांगलाच चोप दिला. त्यानंतर या घटनेची माहिती मानपाडा पोलिसांना देत या तरुणाला पोलिसांच्या ताब्यात दिले. प्रीतम गायकवाड असे या तरुणाचे नाव असून मानपाडा पोलिसांनी प्रीतमला ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रीतम गायकवाड हा सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा मुलगा असून तो अंधेरी मरोळ येथे राहणारा आहे. तो गुरुवारी रात्री डोंबिवलीत त्याच्या नातेवाईकाकडे आला होता.

सदर महिलेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, रात्री अकरा वाजता माऊली बंगला येथून घरी पायी जात असतांना प्रितम गायकवाड हा जवळ आला आणि त्याने तोंडाला पकडून लगट करून मानेवर नखाने ओरखडून स्त्री मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission: 'एसआयआर'ला सुप्रीम कोर्टाचे कायदेशीर कवच; अंतर्गत टिपण्या म्हणजे संस्थात्मक मतभेद नव्हेत! मुख्यमंत्र्यांचा पलटवार

Asian Games 2026: राही सरनोबतचा एक 'निशाणा' चुकला अन् भारताचे पदक गेलं; 'Frame hit' चा फुल ड्रामा, ५५ हजार भरून अपील केले पण...

बाबो! विद्या बालनने सगळ्यांसमोर पती सिद्धार्थला केलं किस, रोमँटिक लिपलॉकचा व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले...

Mumbai News: कोपर्डी प्रकरणी उच्च न्यायालय करणार घटनास्थळाची पाहणी; प्रत्यक्ष पडताळणीचा निर्णय

Latest Marathi News Live Update : तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय आज ‘मामा गोल्ड रिंग योजना’ सुरू करणार

SCROLL FOR NEXT