ऐरोलीतील नाट्यगृह बांधण्यासाठी खोदलेला खड्डा 
मुंबई

ऐरोलीतील नाट्यगृहाचे डबके बनले धोकादायक!

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : ऐरोली, सेक्‍टर ४ येथे नाट्यगृह बांधण्यासाठी नवी मुंबई महापालिकेकडून काम सुरू आहे. या कामासाठी येथे खूप मोठा खड्डा खणून ठेवला आहे. मागील काही वर्षांपासून या नाट्यगृहाचे काम ठेकेदाराने थांबविले आहे. त्यामुळे येथे खणून ठेवलेल्या खड्ड्याचे रूपांतर एका भल्या मोठ्या तळ्यात झाले आहे आणि याच साठलेल्या पाण्यात ऐरोली येथील एका ६३ वर्षीय महिला सुमती नाईक यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली. 

मंगळवारी (ता. २०) या महिलेचा मृतदेह पाण्यात तरंगत असताना दिसल्यांनतर ऐरोली, सेक्‍टर ४ मध्ये खळबळ माजली. तत्काळ या ठिकाणी पोलिसांना पाचारण करण्यात येऊन मृतदेह बाहेर काढण्यात आला. पुढे शवविच्छेदनासाठी वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालयात पाठवण्यात आला. याच पाण्याच्या डबक्‍यात जानेवारी २०१८ मध्ये एका महिलेने आपल्या लहान मुलासह आत्महत्या केल्याची घटना घडली होती. दोन वर्षांमध्ये या डबक्‍यामध्ये आत्महत्या करण्याची ही दुसरी घटना आहे. त्यामुळे ऐरोली नाट्यगृहाचे डबके हा सुसाईड पॉइंट झाला आहे का, असा सवाल ऐरोलीकरांकडून उपस्थित केला जात आहे.

ऐरोली, सेक्‍टर ४ येथे नाट्यगृहाकरिता पाच वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठा गजावाजा करत माजी आमदार संदीप नाईक, नगरसेवक एम. के. मढवी यांनी उद्घाटन केले होते; मात्र ठेकेदाराने आर्थिक विवंचनेचे कारण दाखवत काम पूर्ण केले नव्हते. या ठिकाणी खड्डा खोदून काम बंद करून ठेवण्यात आले आहे. त्यामुळे येथे एक मोठे डबके तयार झाले असून, या डबक्‍यात ऐरोली, सेक्‍टर- ५ येथील शिवकृपा अपार्टमेंटमधील महिलेने आत्महत्या केली. रविवारी पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास या महिलेने ऐरोली नाट्यगृहाच्या या डबक्‍यात आत्महत्या केली. त्यानंतर ही महिला हरवल्याची तक्रार देण्यात आली होती; मात्र मंगळवारी (ता.१२) सकाळी या महिलेचा मृतदेह पाण्यावर आल्याने पोलीसांनी तो मृतदेह बाहेर काढला. ओळख पटल्यांनतर वाशी संदर्भ रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. या डबक्‍यात दुसऱ्यांदा अशी घटना घडल्यामुळे रहिवाशांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. 

यापूर्वीही मुलासह आईची आत्महत्या
याच पाण्याच्या डबक्‍यात जानेवारी २०१८ मध्ये एका महिलेने आपल्या लहान मुलासह आत्महत्या केल्याची घटना घडली होती. दोन वर्षांमध्ये या डबक्‍यामध्ये आत्महत्या करण्याची ही दुसरी घटना आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT