मुंबई

हॉटेलमधून चक्क महागड्या दारूच्या बाटल्या गायब; पोलिस तपासात 'या' गोष्टी आल्या समोर

प्रशांत कांबळे


मुंबई : दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध जपानी हॉटेलमधून  50 महागड्या दारूच्या बाटल्या व सुशी चाकूचा संच चोरल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी ताडदेव पोलिसांनी हॉटेल व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिस अधिक तपास करत आहेत. 

ताडदेव येथील रेसकोर्स येथील किबा हॉटेलमध्ये हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी हॉटेलच्या तीन भागीदारांपैकी एक आफताब इक्बाल मून यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, लॉकडाऊनमुळे मार्च महिन्यापासून हॉटेल बंद होते. 11 ऑगस्टला मून यांनी हॉटेलची पाहणी केली असता हॉटेलमधील 50 दारूच्या महागड्या बाटल्या व सुशी चाकूंचा संच, मायक्रोवेव व इतर वस्तू गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

चोरीच्या मालमत्तेची किंमत चार लाख 23 हजार रुपये आहे. त्यांनी सुरक्षा रक्षकाला याबाबत विचारले असता त्याने व्यवस्थापक जॅक्सन थम्पिट जॉन यांनी या वस्तू नेल्याचे सांगितले. त्यानंतर मून यांनी हा प्रकार दोन भागीदार नीति गोयल व रोनल रोचलानी यांना सांगितला. त्यांनी व्यवस्थापकाला दूरध्वनी करून वस्तूंबाबत विचारले असता त्यांने योग्य उत्तर दिले नाही. त्यानंतर व्यवस्थापकाने दूरध्वनी बंद केला. त्यानंतर मून यांनी  ताडदेव पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी भादंवि कलम 381नूसार चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

-------------------------------------

संपादन - तुषार सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav Ayurvedic Prasad: गणेशोत्सवातील प्रसादातून मज्जाधातूचे पोषण; आयुर्वेदानुसार मोदक, पंचामृत, लाडू व लाह्यांचे मेंदूवर्धक गुण

आजचे राशिभविष्य - 11 सप्टेंबर 2026

Haritalika Ritual: हरितालिका व्रताचा खरा अर्थ काय? पार्वतीच्या तपश्चर्येपासून विवाहातील प्रेम, निवड, संयम आणि नात्यांच्या संतुलनापर्यंत

Ayurvedic Treatment: ३५व्या वर्षी हाडे ठिसूळ होऊन वारंवार फ्रॅक्चर का? आयुर्वेदातून काय मदत मिळू शकते; आहार, अभ्यंग आणि उपचाराबाबत जाणून घ्या

Lucky Zodiac Signs : 10 वर्षांनंतर जुळून आला 'त्रिग्रही योग'! 11 सप्टेंबरला मिथुन, धनुसह 5 राशींना लॉटरी लागण्याची शक्यता; जुन्या गुंतवणुकीतूनही मिळणार बंपर परतावा

SCROLL FOR NEXT