then do the movement Ghantanad MNS warns
then do the movement Ghantanad MNS warns 
मुंबई

...तर घंटानाद आंदोलन करू ; मनसेचा इशारा

नंदकिशोर मलबारी

सरळगांव (ठाणे) : मुरबाडकरांना भेडसावणाऱ्या समस्यांकडे मुरबाड नगर पंचायतीचे लक्ष केंद्रीत करण्यासाठी मुरबाड मनसेच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्याचा इशारा दिला. गणेशोत्सव (2018) सुविधांवर झालेल्या अनाठाई खर्चाची चौकशी या मुद्दाला प्रथम प्राधान्य असणार आहे, अशी माहिती मुरबाड शहर अध्यक्ष नरेश देसले यांनी दिली.    

तीन हात नाका ते मुख्य बाजार पेट रस्त्याच्या मधोमध असलेले धोकादायक विजेचे पोल काढून रस्त्याच्या दुतर्फा लावणेबाबत, तीन हात नाका ते मुख्य बाजारपेठ रस्त्यादरम्यान महिलांसाठी शौचालय, फुटपाथ मोकळे करण्याबाबत शेळके पाडाअंतर्गत रस्त्याच्या दुरूस्ती, जॅमर खरेदीवर झालेल्या खर्चाची चौकशी, वृक्ष लागवडीवर  झालेल्या खर्चाची चौकशी करण्याबाबत, अनेकवेळा लेखी निवेदन, आंदोलन, निषेध मोर्चे काढून ही नगरपंचायतीने झोपेचे सोंग घेतले आहे.

जनतेच्या पैशाची होणारी उधळपट्टी, स्वच्छतेकडे दुर्लक्ष अशा अनेक बाबींकडे नगरपंचायतींकडून डोळेझाक केली जात आहे. म्हणून नगरपंचायतीला कर्तव्याची जाण करून देण्यासाठी घंटानाद आंदोलन करण्याचा इशारा मनसेने लेखी निवेदनामार्फत दिला आहे. यावेळी मनसेचे शहरअध्यक्ष नरेश देसले, उपाध्यक्ष सागर भंडारी, विलास हूमणे, अशाच बाग, संघटक कैलास खरे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

15 दिवसांत निवेदनात नमूद केलेल्या समस्यांचे निवारण न झाल्यास नगरपंचायतीच्या कार्यालयासमोर बेमुदत घंटानाद केला जाणार आहे.    

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : जागावाटपाच्या ‘तिढ्या’वर चर्चा ; कोल्हापूर दाैऱ्यात शिंदेंच्या भेटीगाठी

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

'नाष्ट्याला राजकारणी खातो' म्हणणारे TN शेषन काँग्रेसकडून होते निवडणुकीच्या रिंगणात; भाजपच्या दिग्गज नेत्याला दिलं होतं आव्हान

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगे मोदींपेक्षा मोठे नेते, छगन भुजबळांचा टोला

SCROLL FOR NEXT