raut.jpg 
मुंबई

'डोकी फुटली तर मग रडत दिल्लीला जाऊ नका', संजय राऊतांचा थेट इशारा 

दीनानाथ परब

"मी स्वत: कर्नाटकला जाण्याचा विचार करतोय, तिथल्या लोकांचे मला फोन येत आहेत. मी बेळगावात जाऊ शकतो" असे संजय राऊत म्हणाले. "मी बेळगावला गेलो, तेव्हा मला रोखण्याचा प्रयत्न झाला.  बेळगाव या देशाचा भाग आहे. कर्नाटक, बेळगावातून मुंबई-महाराष्ट्रात येता, मग मराठी माणसांना का रोखता? त्यांच्यावर लाठया चालवता, बंदुका रोखता,  बंदुका आमच्याकडे नाहीत का ?" असा सवाल संजय राऊत यांनी केला. 

"हा देश एक आहे. हा देशाचा अंतर्गत प्रश्न आहे. भाषावाद वाढू नये असे आम्हाला वाटते. राष्ट्रीय एकात्मता आम्ही मानतो, पण तेवढीच जबाबदारी कर्नाटक सरकारची सुद्धा आहे" असे संजय राऊत यांना सांगितले. 

 "आम्हाला कठोर पावलं उचलायला भाग पाडली, तर ती पावलं सरकारी नसतील, राजकीय असतील. मग डोकी फुटली तर दिल्लीला जाऊ नका.  गेल्या 60 वर्षात बाळासाहेबांनी आम्हाला तशी ताकद मनगटात दिली आहे" असे संजय राऊत म्हणाले. 

"बेळगावात मराठी माणसावर अत्याचार, दडपशाही सुरु आहे. त्याची दखल कोणी घेत नसेल, तर महाराष्ट्र सरकारला पूर्ण ताकदीनिशी उतरावं लागेल" असा इशारा खासदार आणि शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला. 

"बेळगावातील शिवसेनेच्या  तालुका प्रमुख, जिल्हा प्रमुखांवर कन्नड वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. बेळगावातील कायदा-सुव्यवस्था उद्धवस्त झाली आहे. हा एकाराजकीय पक्षाचा विषय नाही. विरोधीपक्षासह सर्वपक्षीय शिष्टमंडळ तात्काळ बेळगावला पाठवलं पाहिजे. अन्यथा हा तणाव वाढत जाईल" असे राऊत म्हणाले. "सांगली, कोल्हापुरातून लोक आतमध्ये शिरली, तर शिवसेना, महाराष्ट्र सरकाराला दोष देऊ नका" असा इशारा संजय राऊत यांनी दिला. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke MPSC : धर्म-जातीच्या नावावर मत मागता, पण शिक्षणाचं काय?’; पुण्यातील एमपीएससी आंदोलनात अभिजीत दिपकेंचा सवाल

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

SCROLL FOR NEXT