Sharad Pawar behind Shiv Sena split Kesarkar allegation mumbai sakal
मुंबई

'त्या' विधानाबद्दल केसरकरांकडून शरद पवारांची जाहीर माफी; म्हणाले...

राज्यातील सत्तांतराच्या काळात केसरकारांनी माध्यमांशी बोलताना शिवसेनेतील फूट आणि शरद पवारांचा उल्लेख केला होता. पण यातून त्यांनी पवारांबद्दल अनुद्गार काढल्याची चर्चा रंगली आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्याचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्याबद्दल आमदार दीपक केसरकर यांनी गेल्या काही दिवसांत माध्यमांशी बोलताना शरद पवारांबद्दल अनुद्गार काढल्याची चर्चा होती. पण आपण कधीही असं वागलो नाही, पवारांचा माझ्या जडणघडणीत मोठा वाटा असल्याचं सांगत जर मी हे केलं असेल तर शरद पवारांची जाहीर दिलगीरी व्यक्त करतो, असं केसरकर यांनी म्हटलं आहे. (then I expresses public apology to Sharad Pawar says Deepak Kesarkar)

केसरकर म्हणाले, नुकत्याच झालेल्या राज्यातील राजकीय घडामोडींदरम्यान मी जेव्हा विविध मुलाखती दिल्या होत्या त्यामध्ये शरद पवारांबद्दलचा उल्लेख होता. पण पवारांबद्दल मी कधीही अनुद्गार काढलेले नाहीत. माझ्या जडणघडणीत ज्यांचा मोठा वाटा आहे, त्यापैकी एक पवार आहेत. त्यामुळं त्यांच्याबद्दल एकही अपशब्द माझ्या तोंडून येऊ शकत नाही.

शिवसेनेत जी फूट झाली त्या वस्तूस्थितीबद्दल मी उल्लेख केला होता. २०१४ मध्ये शरद पवारांनी भाजपला जाहीर पाठींबा जाहीर केला होता. त्यामुळं शिवसेनेचा तडजोडीची शक्ती कमी झाली होती. या घडलेल्या घटना आहेत, त्यामुळं या घटना आणि त्यांच्याबद्दल चुकीचं उल्लेख करण्याचा काहीही संबंध येत नाही. महाराष्ट्राचे ते ज्येष्ठ नेते आहेत प्रत्येकाला त्यांचा आदर आहे. त्यामुळं चुकून सुद्ध एखादा शब्द माझ्या तोंडून निघाला असेल तर मी शरद पवार यांची जाहीर दिलगिरी व्यक्त करतो. इतरांबद्दल मला काहीही म्हणायचं नाही, असंही केसरकर यांनी म्हटलं आहे.

जितेंद्र आव्हाड हे मला हेलिकॉप्टरनं भेटायला आले होते. पण ते शरद पवारांचा निरोप घेऊन आले नव्हते. तर नारायण राणेंच्या मुलाचा प्रचार करा असं सांगायला ते आले होते. पण पवार जेव्हा सावंतवाडीला आले होते तेव्हा मी माझ्या मतदारसंघात आले तेव्हा मी माझा राजीनामा त्यांच्याकडे सोपवला होता. त्यांना नम्रपणे मी सांगितलं होतं की, मी राणेंचा प्रचार करु शकत नाही, असंही स्पष्टीकरण केसरकर यांनी आव्हाडांबाबत दिलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lawyer Rakesh Kishor: मोठी बातमी! सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलावर कारवाई; बार कौन्सिलने घेतला मोठा निर्णय

Kannad Nagarparishad Election : कन्नड नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव; शहरात ‘भावी वहिनीसाहेब’ ताईसाहेब चर्चेत

Latest Marathi News Live Update : खासदर शोभाताई बच्छाव यांचा पाचोरा तालुक्यातील पाहणी दौरा पूर्ण

Dombivali News : दिवा स्वतंत्र पोलीस ठाण्याचा विषय मार्गी लावा; मनसे नेते राजू पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

By-elections in Seven States : बिहार निवडणुकीसोबतच सात राज्यातील आठ विधानसभा जागांसाठी पोटनिवडणुकीची घोषणा!

SCROLL FOR NEXT