मुंबई

संक्रात झाली गोड! एकेकाळी मुंबईचे हॉटस्पॉट ठरलेल्या या भागात कोविडचा एकही रुग्ण नाही

समीर सुर्वे

मुंबई: संक्रातीच्या मुहूर्तावर मुंबईच्या हॉटस्पॉटमध्ये महत्वाची घटना घडली आहे. सॅन्डहस्ट रोड, भायखळा, वरळी, दादर, माहिम यासह बोरीवलीतील एकाही इमारतीत कोविडचा रुग्ण आढळून आलेला नाही. संपूर्ण शहरातील अवघ्या 141 इमारतींमध्ये सध्या कोविडचे रुग्ण असल्याने या इमारती सिल करण्यात आल्या आहेत.

महानगर पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ही माहिती प्रसिद्ध केली आहे. मुंबईत आजही 2 हजार 312 वस्त्या आणि चाळींमध्ये कोविडचे रुग्ण आढळल्याने त्या प्रतिबंधित करण्यात आल्या आहेत. यात 7 लाख 37 हजार नागरिक राहत आहेत. सिल इमारतींमध्ये 9 लाख 29 हजार नागरिक राहत आहेत.

घाटकोपर एन प्रभागात सर्वाधिक 23 सिल इमारती आहेत. त्या खालोखाल अंधेरी जोगेश्‍वरी पश्‍चिम के पश्‍चिम 14 आणि के पूर्व अंधेरी, जोगेश्‍वरी पूर्व प्रभागात 14 इमारती सिल आहेत. जी उत्तर म्हणजे दादर, माहिम, धारावी परिसरातील फक्त चार वस्त्या सिल करण्यात आल्या आहेत. चेंबूर पूर्व, एम पूर्व प्रभागातील सहा आणि भायखळा ई प्रभागातील आठ वस्त्या आणि चाळींमध्ये कोविडचे रुग्ण असल्याने त्या सिल करण्यात आल्या आहेत.

कांदिवली आर दक्षिण प्रभागातील 262 आणि के पश्‍चिम प्रभागातील 241 वस्त्या आणि चाळींमध्ये कोविडचे रुग्ण असल्याने त्या सिल करण्यात आल्या आहेत. मार्च पासून जून-जुलै पर्यंत वरळी, दादर, धारावी परिसरात कोविडचा कहर झाला होता. बोरीवलीही त्यानंतर हॉटस्पॉटमध्ये आली होती.

------------------------

(संपादन- पूजा विचारे)

There are no patients of Covid 19 hotspot area Mumbai

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Trucks Carrying Cash: चार ट्रक, हजारो कोटींच्या मळलेल्या नोटा अन् पोलीस; वाचा चित्रपटालाही लाजवेल असे थरारनाट्य

Share Market Opening: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजाराची जोरदार सुरुवात; निफ्टी नवीन विक्रमी उच्चांकावर

Freedom At Midnight: 'फ्रिडम एट मिडनाइट' चा फर्स्ट लूक आऊट; जवाहरलाल नेहरूंच्या भूमिकेत 'हा'अभिनेता

Covaxin: कोव्हिशिल्डच्या गोंधळानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा मोठा दावा, वाचा काय म्हणाली कंपनी

SCROLL FOR NEXT