मुंबई

कोविशिल्ड लशीचं घोंघडं भिजतच! क्लिनिकल ट्रायलसाठी अनंत अडचणींचा डोंगर

भाग्यश्री भुवड


मुंबई :  कोरोनावरील कोविशिल्ड वॅक्सिनची मानवी चाचणी देशभरातील 10 सेंटरमध्ये एकूण 1600 निरोगी लोकांवर एकाच वेळी घेतली जाणार आहे. मात्र, या चाचणीसाठी असंख्य अडथळे येत असल्याची माहिती समोर आली आहे.

कोविशिल्ड वॅक्सिनच्या क्लिनिकल चाचणीसाठी एथिकल कमिटीने काही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्या नुसार सिरम इन्स्टिटयूटला इन्शुरन्स बाबत विचारणा केली आहे. तर दुसऱ्या बाजूला आयसीएमआरला बजेट द्या अशी विचारणा करण्यात आली आहे. मुळात या वॅक्सिनकडे महत्वाकांक्षी प्रकल्पाप्रमाणे पहिले जात आहे. मात्र त्याला विलंब होत असल्याची खंत व्यक्त होत आहे. या वॅक्सिनसाठी एथिकल कमिटीचा हिरवा कंदील हवा आहे. मात्र, दोन प्रश्न उपस्थित केल्याने आता कोविशिल्ड वॅक्सिन क्लिनिकल चाचणीचे काय होणार ? या बाबत प्रश्न निर्माण झाला आहे. 

एथिकल कमिटीकडून दोन प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. एथिकल कमिटीने गुरुवारी आयसीएमआर आणि सिरम इन्स्टिट्यूटला इन्शुरन्स आणि बजेट बाबत विचारणा केली आहे. अजून एक दोन दिवसात त्याचा रिप्लाय येईल. सिरम इन्स्टिट्यूटने इन्शुरन्सबाबतची सर्व माहिती एथिकल कमिटीला दिली पाहिजे. शिवाय, आयसीएमआरही बजेट सांगेल. त्यानंतर ते क्लिनिकल ट्रायल सुरु होईल. 

- डॉ. रमेश भारमल,
संचालक, पालिका प्रमुख रुग्णालये.

या मानवी चाचणीचा दुसरा-तिसरा टप्पा मुंबईतील पालिकेच्या केईएम आणि नायर रुग्णालयात होणार आहे. आयसीएमआरच्या सूचनांनुसार 10 सेंटर्समध्ये ही चाचणी घेतली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Exam Latest Update : ...अखेर राज्यसेवा 2025 च्या मुलाखती ढकलल्या पुढे; नवी तारीख काय? मुख्य परीक्षेबाबत अद्यापही अस्पष्टता!

Rekha Gupta Organ Donation : पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी रेखा गुप्तांचा मरणोत्तर अवयवदानाचा संकल्प; नागरिकांनाही आवाहन

आमचे मार्ग आता जुळत नाहीत! Prithvi Shaw अन् आकृती अगरवाल यांचा वेगळा होण्याचा निर्णय; क्रिकेटपटूच्या पोस्टची चर्चा...

लग्नानंतर स्वयंपाक शिकली मेघना एरंडे; म्हणाली- माहेरची आणि सासरची लोकं गणेशोत्सवात आमच्या घरी येतात आणि...

Latest Marathi News Update : NTA कडून वर्षभरातील परीक्षांचे तात्पुरते वेळापत्रक जाहीर

SCROLL FOR NEXT