anil parab esakal
मुंबई

ShivSena: शिवसेनेवर एकही ओरखडा आलेला नाही, काल सिद्ध झालंय - अनिल परब

उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या गटनेत्यांच्या मेळाव्याला मोठी गर्दी झाली होती.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : पक्ष फुटीनंतर शिवसेनेवर एकही ओरखडा आलेला नाही, हे कालच्या सभेनं सिद्ध झालं आहे, असं शिवसेना नेते आमदार अनिल परब यांनी म्हटलं आहे. बुधवारी मुंबईतील नेस्को सभागृहात शिवसेनेच्या गटनेत्यांचा मेळावा पार पडला. यामध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केलं. या मेळाव्याला शिवसैनिकांनी तुफान गर्दी केली होती. (There is no scratch on Shiv Sena yesterday proved it says Anil Parab)

कालच्या मेळाव्यानंतर विरोधकांनी उद्धव ठाकरेंवर टीका करायला सुरुवात केली आहे. यावर भाष्य करताना अनिल परब म्हणाले, "मनसेकडून फक्त इशारेच देण्याचं काम चालतं. कालच्या मेळाव्यानं शिवसेनेवर एकही ओरखडा आलेला नसल्याचं सिद्ध झालंय. कालच्या मेळाव्यावरुन सर्वांच्या पाया खालची वाळू सरकली आहे. त्यामुळं कोण काय टीका करतंय याकडं आमचं लक्ष नाही. आमचं लक्ष कामाकडे आणि मुंबईकरांच्या सेवेकडं आहे. त्यामुळं त्यांना जे वाटतं ते त्यांनी सांगितलं, आम्हाला जे वाटतं ते आम्ही सांगतो. ही राजकीय लढाई आहे ती चालूच राहणार"

खरी शिवसेना कोणती हे आयोग आणि कोर्ट ठरवेल

खरी शिवसेना काय हे इलेक्शन कमिशन आणि कोर्टाला ठरवायचं आहे. खरी शिवसेना कोणतीह आहे हे काल लोकांनी बघितलंय. त्यामुळं येत्या काळातचं याबाबत सर्व स्पष्ट होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock market News : ‘MRF’ स्टॉकशी पुन्हा बरोबरी केली ‘या’ शेअरने! ; 3 रुपयांवरून थेट 300000 पर्यंत वाढली होती किंमत अन् आता...

Vaibhav Taneja : इलॉन मस्कच्या नव्या 'अमेरिका पार्टी'चा खजिनदार भारतीय वंशाचा; कोण आहे सीएफओ वैभव तनेजा?

Jayakwadi Dam: जायकवाडी धरणाने २५ वर्षांचा रेकॉर्ड मोडला; जुलैच्या पहिल्याच आठवड्यात 'इतका' पाणीसाठा

१०व्या मराठी फिल्मफेअर पुरस्कार नामांकनांची यादी जाहीर; कोण ठरणार सर्वोत्कृष्ट? 'या' चित्रपटांमध्ये चुरस

Vasant More : ''शिवतीर्थ, मातोश्री लांब राहिलं आधी आमच्या अंगावर या''; वसंत मोरेंनी घेतला निशिकांत दुबेंचा समाचार...

SCROLL FOR NEXT