मुंबई

खासगी रुग्णालयांच्या शुल्कावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा आहे का? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल

सुनिता महामुनकर



मुंबई : कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर पीपीई किट आणि अन्य संरक्षित वस्तूंसाठी भरमसाठ शुल्क आकारून  रुग्णांची लुबाडणूक होऊ नये यासाठी खासगी रुग्णालयांंच्या शुल्क आकारणीवर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा आहे का, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केला आहे.

मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील दोन रुग्णालयांंकडून पीपीई किटसाठी (मास्क, ग्लोव्हज, सॅनिटायझर) प्रचंड रक्कम वसूल केल्याचा आरोप करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात अॅड. अभिजित मांगडे यांनी केली आहे. ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात याचिकादाराच्या आईला बिगर कोव्हिड उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांना सात दिवस रुग्णालयात ठेवण्यात आले. त्यासाठी त्यांच्याकडून 72 हजार 806 रुपये शुल्क पीपीई किटसाठी आकारण्यात आले. दादरमधील पुनामिया नर्सिंग होममध्ये दाखल झालेल्या अन्य एका रुग्णाकडून तीन दिवसांच्या पीपीई किटसाठी सोळा हजार रुपये शुल्क आकारल्याचे याचिकेत सांगितले आहे. यावर राज्य सरकारने मेमध्ये जारी केलेल्या अध्यादेशानुसार खासगी रुग्णालयांंना अवास्तव शुल्क आकारणी करण्यास सक्त मनाई केली आहे. यामध्ये खाटा आणि अन्य शुल्कांचा समावेश आहे, अशी माहिती सरकारी वकील निशा मेहरा यांनी  दिली. दोन्ही रुग्णालये आणि सरकारला याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. याचिकेवर पुढील सुनावणी 7 आॅगस्टरोजी होणार आहे.

रुग्णालयांची नफेखोरी?
सध्याच्या साथीच्या परिस्थितीमध्ये रुग्णांच्या असहाय्यतेचा कोणी गैरफायदा घेऊ नये. यासाठी काही नियंत्रण यंत्रणा सरकारने तैनात केली आहे का, असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला. पीपीई किटच्या बाॅक्समधील वस्तू अनेक रुग्ण वापरत असतील. मग, प्रत्येक रुग्णाकडून संपूर्ण बाॅक्सचे शुल्क आकारुन रुग्णालये नफेखोरी करीत नाही ना, असा प्रश्न न्यायालयाने केला.

-------------------------------------------

Edited by Tushar sonawane

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Pakistan Nuclear Risk : भारत-पाकिस्तान अणुयुद्ध कधीही पेटू शकते, कोणी केला खळबळजनक दावा?

Panchang 19 March 2026: आजच्या दिवशी बृहस्पती कवच स्तोत्राचे पठण आणि ‘बृं बृहस्पतये नमः’ या मंत्राचा जप करावा

Unseasonal Rain: शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली! फलटण, माणमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा; रस्ते, शेतात गारांचा थर, पिकांचे नुकसान..

आजचे राशिभविष्य - 19 मार्च 2026

अग्रलेख : विकृतीचे ‘तेजाब’

SCROLL FOR NEXT