मुंबई

"तडिपारीची कारवाई करण्यासाठी 'त्या' व्यक्तीपासून समाजाला धोका असणे आवश्यक आहे" : हायकोर्ट

- सुनीता महामुणकर

मुंबई, ता. 9 : केवळ कुंटुबियांना धोका आहे म्हणून एखाद्या व्यक्तीवर जिल्ह्यातून तडिपारीची कारवाई होऊ शकत नाही, तडिपारीची कारवाई करण्यासाठी त्या व्यक्तीपासून समाजाला धोका असणे आवश्यक आहे, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदविले आहे.

अकोलामध्ये राहत असलेल्या एका बासष्ठ वर्षी शेतकऱ्याला आणि त्याच्या दोन्ही मुलांना स्थानिक पोलिसांनी चार जिल्ह्यातून तडिपार करण्याचे निर्देश दिले आहेत. या तिघांविरोधात निकटच्या एकाच कुटुंबातील व्यक्तिंनी तब्बल सतरा फौजदारी फिर्यादी नोंदविल्या आहेत. तिघांनी ही तडिपारीच्या आदेशाविरोधात नागपूर उच्च न्यायालयात याचिका केली आहे. न्या. सुनील शुक्रे आणि न्या. अविनाश घारोटे यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर नुकतीच सुनावणी झाली. न्यायालयाने पोलिसांनी दिलेला तडिपारीचा आदेश रद्दबातल केला आहे. 

केवळ सतरा फिर्यादी दाखल केल्या आणि एका कुटुंबाला किंवा त्यातील काही व्यक्तिंना धोका आहे म्हणून तडिपारीचा आदेश देता येऊ शकत नाही. कायद्याच्या कक्षेत तडिपार करणे याला व्यापक अर्थ आहे. जर समाजाला आणि व्यवस्थेला संबंधित व्यक्तीपासून धोका असेल आणि त्यामुळे कायदा सुव्यवस्था असुरक्षित होत असेल तर तडिपार करण्यावर विचार होऊ शकतो. मात्र कुंंटुबाविरोधात सतरा फौजदारी फिर्यादी दाखल झाल्या म्हणून तडिपार कारवाई होऊ शकत नाही, असे खंडपीठाने स्पष्ट केले आहे.

कौटुंबिक वादातून शेतकरी आणि त्यांच्या दोन मुलांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी अकोलासह चार जिल्ह्यातून त्यांना तडिपार केले आहे. न्यायालयाने हा आदेश रद्द केला आणि याचिका निकाली काढली.

there must be a threat to the society from person if action of externment is suppose to be taken

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET 2027: पुढच्या वर्षीच्या नीट परीक्षेत होणार 'हे' बदल! वर्षातून अनेकवेळा परीक्षा होण्याची शक्यता

Pankaja Munde : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा पालकमंत्र्यांसमोर आक्रोश, सरकार शेतकरी-पशु पालकांच्या पाठीशी

CBSE Three Language Policy : सीबीएसईच्या सहावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! त्रि-भाषा धोरणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; काय दिले निर्देश?

Alegaon Murum Mining: आळेगाव पागा मुरूम उत्खनन प्रकरण: पंचनाम्यातील आकडे संशयास्पद, पर्यावरणप्रेमींची सखोल चौकशीची मागणी

Pitru Paksha 2026 : पितृपक्षात श्राद्धाचं जेवण कसं असावं? शास्त्रानुसार काय वाढावं आणि काय टाळावं जाणून घ्या

SCROLL FOR NEXT