आयुर्वेद म्हणतंय लहान मुलांसाठी 'हे' पदार्थ ठरतात 'विष'

आयुर्वेद म्हणतंय लहान मुलांसाठी 'हे' पदार्थ ठरतात 'विष'
Updated on

मुंबई : आपल्या दररोजच्या खाण्याच्या सवयींमध्ये असे अनेक खाद्यपदार्थ आहेत जे एकत्रित खाणं आपण सर्वानीच टाळलं पाहिजे. आपण  असे पदार्थ खातोच सोबत आपल्या लहान मुलानं देखील हे आवडीने खाऊ घालतो. मात्र लहान मुलांसाठी असे काही खाद्यपदार्थ अत्यंत हानिकारक ठरू शकतात. काही खाद्यपदार्थ एकत्रित खाणं आपल्या शरीरासाठी नुकसानकारक ठरू शकतात.

आयुर्वेदानुसार दह्यासोबत फळं खाल्ल्याने जठराग्नी कमी होतो आणि सोबतच शरीरात विषारी पदार्थ देखील तयार होण्यास सुरवात होते. यामुळे ऍलर्जी, सर्दी किंवा खोकला होऊ शकतो. त्यामुळे आयुर्वेदात सागितल्याप्रमाणे खालील पदार्थ आपल्या लहानग्यांना देणं टाळा. 

व्हाईट ब्रेड आणि जॅम 

लहान मुलांना न्याहारीत ब्रेड आणि जॅम प्रचंड आवडतो. मात्र तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की, हे कॉम्बिनेशन आरोग्यासाठी अत्यंत अपायकारक आहे. व्हाईट ब्रेड आणि जॅम खाल्ल्याने शरीरातील ब्लड शुगरचे प्रमाण अचानक वाढते. यामुळे लहान मुलांना प्रचंड थकवा जाणवतो. लहान मुलांना थकवा जाणवल्याने त्यांच्या दररोजच्या कामांवर प्रभाव पडू शकतो. व्हाईट ब्रेड आणि जॅम खाल्ल्याने मुलांना थकवा आणि झोप येते. 
 
याशिवाय व्हाईट ब्रेड आणि जॅम खाल्ल्याने रक्तवाहिन्यांमधील साखरेचं प्रमाण अचानक वाढतं.  ज्यामुळे शरीराला इन्सुलिन तयार करण्यास अधिक मेहनत घ्यावी लागते. यामुळे शरीरातील स्वादुपिंडावर अनावश्यक दबाव येतो. व्हाईट ब्रेडशिवाय मुलांना होल ग्रेन ब्रेड किंवा मल्टिग्रेन ब्रेड खायला द्यावा असं तज्ज्ञ सांगतात. 

मांस आणि स्टार्च

बटाटे, पास्ता आणि ब्रेड इत्यादी स्टार्चयुक्त पदार्थ कधीही मांसाबरोबर खाऊ नये. या दोन गोष्टी एकत्र खाऊन पचवण्यासाठी पोटात वेगवेगळ्या परिस्थितीची आवश्यक असते. जमध्ये विशेषत: ऍसिडिटीची पातळी महत्त्वपूर्ण कार्य करते.

लहान मुलांना प्रोटीन आणि स्टार्चचे पदार्थ एकत्रित खायला देऊ नये. यामुळे शरीराला नक्की आधी प्रोटीन पचवायचे की आधी स्टार्च पचवायचे हे समजत नाही. काही संशोधनांमधून असं समोर आलं आहे की शरीर आधी प्रोटीन पचवते आणि नंतर स्टार्च. अशात प्रोटीन पचवताना शरीरातील आम्लांच्या मदतीने स्टार्च अधिकच आंबतात (फर्मेंट होतात). अशात पोटात अन्न पदार्थ सडल्याने शरीरात विषारी पदार्थ तयार होण्यास सुरवात होते. अशात पोटात गॅस होणं, पोट फुलणं अशा समस्या उद्भवण्यास सुरवात होते.  

अशात समजदार म्हणजे लहानग्यांना एका वेळी एकाच पद्धतीचे अन्नपदार्थ खाण्यास द्या. असं न केल्यास मुलांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. लहान मुलाच्या जेवणात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा. 

अनेकदा पालक लहानग्यांना दूध आणि केळी एकत्रित खायला देतात. आयुर्वेदानुसार हे पूर्णपणे चुकीचे आहे. आयुर्वेदानुसार दूध आणि केळी एकत्रित खाल्ल्यास शरीरात विषारी पदार्थ तयार होण्यास मदत करतात. यामुळे मेंदू सुस्त होतो. म्हणूनच केळ्याची स्मूदी खाल्य्यास मुलांना सुस्ती येते  आणि तंद्री लागते. केळी आणि दूध एकत्रित खाल्याने कफ देखील वाढतो आणि खोकला तसेच सर्दी देखील होऊ शकते.   

health news as per ayurveda do not serve these thing together specially to your children

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com