best bus 
मुंबई

कुठे बस पडली बंद तर कुठे सोशल डिस्टंसिंगची ऐशीतैशी; मुंबईकर म्हणतायत हे काही 'बेस्ट' नाही... 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई: अडीच महिने बंद असलेली बेस्ट उपक्रमाची बससेवा आजपासून सुरू झाली. सकाळपासून प्रत्येक थांब्यावर तुडुंब गर्दी झाली होती. लोकल बंद असल्याने प्रत्येक बस भरून येत होती. बसमध्ये चढता न आल्याने चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले. सुमारे अडीच हजार बसगाड्या रस्त्यावर आणल्याचा दावा प्रशासनाने केला असला, तरी सोशल डिस्टन्सिंगची ऐशीतैशी झालेली बघायला मिळाली. 

सुरुवातीच्या थांब्यापासूनच भरून येणाऱ्या बस पुढे थांबतच नव्हत्या. प्रत्येक बसमध्ये 30 ते 35 प्रवासी होते. मधल्या थांब्यावर एखाद-दुसरा प्रवासी उतरल्यास तेवढ्याच लोकांना बसमध्ये घेतले जात होते. त्यामुळे बस थाब्यावर प्रवाशांची रखडपट्टी होत होती. एका बसमध्ये प्रत्येक आसनावर एक व्यक्ती याप्रमाणे फक्त 30 जणांना बसून व पाच जणांना उभ्याने प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. 

थांब्यांवर वाट पाहणाऱ्या प्रवाशांना बस मिळत नव्हती. त्यामुळे प्रवासी हतबल झाले होते. कामावर वेळेत पोहोचण्यासाठी रिक्षा किंवा टॅक्सी हा पर्याय नोकरदारांपुढे होता. बससह खासगी वाहने मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर आल्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. बऱ्याच दिवसांनी रस्त्यावर आलेली वाहने ठिकठिकाणी बंद पडल्याचे दिसत होते. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत होती. वाहतूक कोंडीमुळे सामान्यांचे मोठे हाल झाले. 

बेस्ट बससोबत अत्यावश्यक सेवेसाठी काही लोकल सोडल्या असत्या, तर प्रवाशांचे हाल झाले नसते. लोकल उशिरा सुरू झाल्यास मुंबईकरांच्या गैरसोईत भर पडण्याची शक्यता आहे. बस अपुऱ्या असल्यामुळे सोशल डिस्टन्सिंग धुळीला मिळाल्याचे दिसले. परिस्थिती अशीच राहिल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. 

'विवेकशून्य निर्णय':

कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही कमी झालेला नाही; असे असताना कर्मचाऱ्यांना सुरक्षा न पुरवता कामावर बोलावणे योग्य नाही. हा निर्णय विवेकशून्य असल्याची टीका कामगार नेते शशांक राव यांनी केली. बस वाहक आणि चालकांच्या सुरक्षेचे काय, असा सवालही त्यांनी केला.

there is no social distansing in BEST bus on unlock day one 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

MP Naresh Mhaske : अर्बन नक्षल घुसखोरीवरून पुरोगामी नेत्यांची कोल्हेकुई; नरेश म्हस्केंची घणाघाती टीका

Loan Penalty: आरबीआयकडून मोठा दिलासा! आता कर्जाच्या प्री-पेमेंटवर दंड भरावा लागणार नाही, नियम कधीपासून लागू होणार?

Georai Crime : गायरान जमिन का कसता? असे म्हणून अदिवासी कुटुंबीयाना कु-हाडीने मारहाण; वडिलांसह माय-लेकी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : पाचोरा बस स्थानक परिसरात भरदिवसा गोळीबार

SCROLL FOR NEXT