मुंबई

अलिबागमधील केंद्रात म्हणून तुम्ही जाणार नाही 

सकाळ वृत्तसेवा

अलिबाग : नागरिकांना वन्य प्राण्यांची माहिती मिळावी यासाठी अलिबाग तालुक्‍यातील कार्ले खिंडीत पाच वर्षांपूर्वी निसर्ग परिचय केंद्र उभारण्यात आले. त्याचे दरवाजे खिळखिळे झाले आहेत. वीजपुरवठाही खंडित झाला आहे. अन्य समस्यांनीही या वास्तूला ग्रासले आहे. त्यामुळे सरकारच्या उद्देशाला हरताळ फासला गेला असून लाखोंचा निधी पाण्यात गेला आहे. हे केंद्र सामाजिक वनीकरण विभागाकडे वर्ग करण्यात आले आहे. 
निसर्ग परिचय केंद्रात वीजवाहिन्या अस्तावस्त पडलेल्या आहेत. ऑक्‍टोबरपासूनचे बिल न भरल्याने वीजपुरवठा बंद करण्यात आला आहे. शौचालयांची अवस्था दयनीय झाली आहे. या परिसरात कचरा पडलेला आहे. 
पाण्याचा अभाव आहे. 

आवारातील कृत्रिम तलावाचे पाणी खराब आहे. काही झाडे सुकून गेली आहेत. दरवाजे खिळखिळे झाले आहेत. त्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड होत आहे. याबाबत अनेकांनी तक्रारीही केल्या आहेत.
असा आहे केंद्राच्या उभारणीचा हेतू वनांची माहिती पर्यटकांना मिळावी, त्याचे महत्त्व त्यांना समजावे, या उद्देशाने कार्ले खिंड येथील वन विभागाच्या जागेमध्ये पाच वर्षांपूर्वी निसर्ग परिचय केंद्र उभारण्यात आले.

या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांची लागवड करण्यात आली. सुसज्ज अशी इमारत बांधून त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्राणी व पक्ष्यांची चित्रे लावण्यात आली. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी सुसज्ज अशी खोली बांधण्यात आली. वाघ पकडण्याचा पिंजरा या केंद्रामध्ये ठेवण्यात आला. 

माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील यांच्या प्रयत्नाने कार्ले खिंड येथील निसर्ग परिचय केंद्राच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. त्याचे कामही चांगले झाले होते. परंतु देखभाल दुरुस्ती योग्य पद्धतीने झाली नसल्याने या केंद्राची अवस्था बिकट झाली आहे. जिल्हा नियोजन मंडळाकडून या केंद्राच्या विकासासाठी प्रयत्न करू.
- पंडित पाटील, माजी आमदार


कार्ले खिंड येथील निसर्ग परिचय केंद्र सामाजिक वनीकरण विभागाकडे वर्ग करण्यात आले आहे. त्यांच्यामार्फत या केंद्राचा विकास केला जाणार आहे.
- मनीष कुमार, उपवनसंरक्षक, वन विभाग, रायगड 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंच्या अडचणीत आणखी वाढ? महिलांना अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार

Asian Games 2026 : बॉक्सिंगमध्ये सुवर्ण हॅटट्रिक! कुस्तीपटू सुजीत कालकलचे रोमहर्षक सुवर्ण, भारताची पदकतालिकेत मोठी भरारी

गायत्री दातारने सांगितलं कसं आहे सासरचं वातावरण; म्हणते- सासूबाई मला काम करू देत नाहीत कारण...

Ladki Bahin Yojana: नवरात्रीआधी लाडक्या बहिणींना गुडन्यूज! ऑगस्टचा हप्ता खात्यात जमा, सरकारकडून मोठी भेट

Latest Marathi News Live Update : मनोज जरागेंच्या ११ समर्थकांविरोधात गुन्हा

SCROLL FOR NEXT