मुंबई

आता समुद्रातही होणार आंदोलन

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : एलईडी या आधुनिक मच्छीमारीच्या पद्धतीमुळे समुद्रातील मासे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे भविष्यात माशांचा दुष्काळ निर्माण होण्याची चिन्हे आहेत. तरीदेखील या मासेमारीवर प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची ठोस भूमिका घेतली जात नाही. त्यामुळे पारंपारिक मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशी प्रतिक्रिया देत संतप्त मच्छीमारांनी एलईडीविरोधात सागरी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

येत्या ३ जानेवारी रोजी अलिबाग येथे सागरी आंदोलन पुकारले जाणार आहे. या आंदोलनात दीड हजारहून अधिक बोटी किनारी लावल्या जाणार असून मोठ्या संख्येने मच्छीमार आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती रायगड जिल्हा पारंपारिक मच्छीमार संघर्ष समितीचे अध्यक्ष दिलीप भोईर यांनी दिली. 

एलईडी लाईटमुळे माशांच्या अनेक प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. एलईडीच्या मासेमारीमुळे पारंपारिक मच्छीमार मेटाकूटीला आला आहे. त्यामुळे मच्छीमारांवर मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. एलईडी मार्फत मासेमारीला बंदी असताना प्रशासनाकडून ठोस कारवाई केली जात नाही. कारवाई केल्याचे दाखवून त्यांना पाठीशी घालण्याचे काम अधिकारी वर्ग करीत आहे. पारंपारिक मच्छीमारांवर एलईडी मच्छीमारांकडून मारहाण केली जात आहे. त्यामुळे पारंपारिक मच्छीमारांच्या जिवीतास धोका निर्माण झाला आहे. 

राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

 येत्या आठ दिवसात शासनाने कोणती ठोस भूमिका घेतली नाही. तर ३ जानेवारी २०२० ला सागरी आंदोलन पुकारले जाणार आहे. या आंदोलनानंतर देखील शासनाने कारवाई केली नाही. तर राज्यव्यापी आंदोलन पुकारून शासनाला एलईडीविरोधात कारवाई करण्यास भाग पाडू असा इशारा दिलीप भोईर यांनी दिला.

web title : There will be a marine agitation at this place

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT