security update on 31st december year  esakal
मुंबई

Mumbai: ३१ डिसेंबर निमित्त मुंबई पोलिसांनी महत्वाचे आदेश केले जारी!

Chinmay Jagtap

Mumbai: नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला वाहतूक कोंडी आणि गर्दी टाळण्यासाठी, मुंबई वाहतूक पोलिसांनी जुहू समुद्र किनाऱ्याजवळील परिसरात वाहतूक नियमनासाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. हे आदेश ३१ डिसेंबर रोजी दुपारी २ ते १ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत लागू राहतील.

नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला विविध ठिकाणी, विशेषत: जुहू सागरी किनारा, तेथील हॉटेल्स आणि जुहू तारा रोडवरील रेस्टॉरंटमध्ये मोठी गर्दी होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांकडून उपाययोजना करण्यात आली आहे.

जुहू तारा रोड, जुहू रोड, जुहू चर्च रोड आणि व्ही.एम. रोडवर वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक पाहता या रस्त्यांवरील वाहतूककोंडीच्या नियमनाचे आदेश जारी करण्यात आले आहेत. जुहू चर्च रोडवर ट्युलिप स्टार हॉटेल जंक्शन ते बलराज सहानी रोड (दक्षिण आणि उत्तर सीमा दोन्ही), सांताक्रूझ (प.) पर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी ‘नो पार्किंग’ असणार आहे. जुहू रोडवरील सर्व प्रकारच्या वाहनांसाठी महाराणा प्रताप जंक्शन ते जुहू कोळीवाडा, सांताक्रूझ (प.), तारा रोडवर जुहू कोळीवाडा जंक्शन ते बी.पी.पर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी ‘नो पार्किंग’ असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विधान परिषद निवडणूक! मतदार सदस्यांना जमा करावी लागणार शस्त्रे, पोलिस अधीक्षकांनी काढले आदेश; सोलापूर जिल्ह्यात ६१६ मतदार, २२ जणांना वैयक्तिक बंदोबस्त

Panchang 27 May 2026 : पद्मिनी एकादशीसह बुधवारी खास योग! जाणून घ्या संपूर्ण पंचांग

आजचे राशिभविष्य - २७ मे २०२६

करिअर वेध : पराकोटीचा ध्यास

विशेष : डिजिटल डिझायनर : मिडजर्नी

SCROLL FOR NEXT