मुंबई

महत्वाच्या विसर्जन दिवसांमध्ये 'असे' असतील कल्याण शहरातील वाहतूक बदल; वाचा सविस्तर

रविंद्र खरात


कल्याण - कल्याण शहरात गणेशोत्सव काळात विसर्जनवेळी वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून विसर्जन सोहळ्याच्या दिवशी मिरवणूक मार्ग, वाहन पार्किंग, प्रवेश बंदी, पर्यायी मार्ग वाहतूक पोलिसांनी जाहीर केले आहे. नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे .

22 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान गणेशोत्सव साजरा होणार आहे. गणपती विसर्जनच्या 23 ऑगस्ट रोजी दीड दिवसाचा, 26 ऑगस्ट रोजी पाच दिवसाचा, 27 ऑगस्ट रोजी गौरी गणपती विसर्जन, 28 ऑगस्ट रोजी सात दिवसाचा, 29 ऑगस्ट रोजी (सार्वजनिक गणेशोत्सव मेळा संघ व एकादशी विसर्जन ), 1 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्थीच्या दिवशी कल्याणमध्ये वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून विसर्जन मार्ग आणि नो पार्किंग, प्रवेश बंदी आणि पर्याय मार्ग जाहीर करण्यात आला आहे .

मिरवणूक मार्ग - कल्याण पश्चिम मुरबाड रोड, महात्मा फुले चौक, महंमद अली चौक, शिवाजी चौक, शंकर राव चौक घेला देवजी चौक, दुधनाका, पारनाका, टिळक चौक, अहिल्याबाई चौक, गणपतीं चौक, तेलवणे हॉस्पिटल क्रॉस, मोहिंदर सिंग काबूलसिंग क्रॉस लाल चौकी दुर्गामाता चौक ते दुर्गाडी गणेश घाट असा मार्ग आहे. या मिरवणूक मार्ग रस्ता आणि जोड रस्त्यावर 31 ठिकाणी नो पार्किंग झोन जाहीर करण्यात आले आहे . ही कालावधी त्या त्या विसर्जन सोहळा दिवशी सकाळी 8 वाजल्या पासून सोहळा संपेपर्यंत वाहतूक मध्ये बदल करण्यात आले याच काळात कल्याण मध्ये जड अवजड वाहनांना पूर्णपणे बंदी आहे .

1 )आधारवाडी सर्कल ते दुर्गामाता चौक , सहजानंद चौक ते दुर्गा माता चौक तसेच दुर्गामाता चौक ते उर्दू स्कूल या संपूर्ण रोड वर नो पार्किंग जाहीर करण्यात आले आहे .

पर्यायी मार्ग -2 ) कोनगाव कडून दुर्गाडी मार्गे कल्याण कडे येणारी हलकी वाहने ही वाडेघर चौक आधारवाडी चौकातुन पुढे इच्छित स्थळी जातील .

3) कोळशेवाडी ते कोनगाव कडे जाणारी सर्व हलकी वाहने ही गोविंद वाड़ी बायपास नाक्यावरून गोविंदवाड़ी मार्गे इच्छित स्थळी जातील .

4) कोनगाव ते शिळफाटा आणि डोंबिवली कडे हलकी वाहने दुर्गाडी पुलावरून विरुद्ध दिशेने म्हणजे दुर्गाडी गोविंद वाड़ी बाय पास मार्गे पुढे इच्छित स्थळी जातील .

5)  दुर्गा माता चौक ते लाल चौकी हा मार्ग नो पार्किंग करण्यात आला आहे .

6) कल्याण गणेश घाट आणि कोनगाव गणेश घाट येथे गणेशमूर्ती विसर्जन च्या दिवशी रहदारीची कोंडी झाल्यास या मार्गाची वाहतूक कल्याण शहरातील गांधारी पूल मार्गे येवई नाका आणि कल्याण कडे येण्यासाठी येवई नाका वरून गांधारी पूल मार्गे सुरू राहील .गणेश भक्त, वाहन चालकांनी गणेशमूर्ती विसर्जन सोहळ्याच्या दिवशी वाहतूक पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन ठाणे वाहतूक विभाग उपायुक्त अमित काळे यांनी केले आहे .

------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav Ayurvedic Prasad: गणेशोत्सवातील प्रसादातून मज्जाधातूचे पोषण; आयुर्वेदानुसार मोदक, पंचामृत, लाडू व लाह्यांचे मेंदूवर्धक गुण

आजचे राशिभविष्य - 11 सप्टेंबर 2026

Haritalika Ritual: हरितालिका व्रताचा खरा अर्थ काय? पार्वतीच्या तपश्चर्येपासून विवाहातील प्रेम, निवड, संयम आणि नात्यांच्या संतुलनापर्यंत

Ayurvedic Treatment: ३५व्या वर्षी हाडे ठिसूळ होऊन वारंवार फ्रॅक्चर का? आयुर्वेदातून काय मदत मिळू शकते; आहार, अभ्यंग आणि उपचाराबाबत जाणून घ्या

Lucky Zodiac Signs : 10 वर्षांनंतर जुळून आला 'त्रिग्रही योग'! 11 सप्टेंबरला मिथुन, धनुसह 5 राशींना लॉटरी लागण्याची शक्यता; जुन्या गुंतवणुकीतूनही मिळणार बंपर परतावा

SCROLL FOR NEXT