मुंबई

'ते' प्रवासी अत्यावश्यक सेवेतील की सामान्य? पोलिसांचा ताप वाढला; टॅक्सीचालकही हतबल

सकाळ वृत्तसेवा


मुंबई : अनलाॅक-1 चा दुसरा टप्पा शुक्रवारी (ता. 5) सुरू झाल्यावर सकळापासूनच टॅक्सी आणि रिक्षा रस्त्यांवर आल्या. परंतु, फक्त अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच परवानगी असल्याने वाहतूक पोलिसांनी ताडदेव, सीएसएमटी, आझाद मैदान परिसरात अनेक टॅक्सी चालकांवर कारवाई केली. त्यामुळे दुपारनंतर टॅक्सी चालकांनी सेवा बंद केली. 

राज्य सरकारने 5 जूनपासून टॅक्सी, रिक्षा सुरू करण्याचा निर्णय घेतला. परंतु, प्रवासी अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आहेत, की सामान्य नागरिक हे ओळखण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या नाहीत. परिवहन विभागानेही सूचना दिलेल्या नाहीत. त्यामुळे वाहतूक विभागाने शुक्रवारी मुंबईत टॅक्सींवर आणि उपनगरांत रिक्षांवर कारवाई करून चालकांना 500 रुपयांचा दंड आकारला, असे टॅक्सीमेन्स युनियनचे सरचिटणीस ए. एल. क्वाॅड्रोस यांनी सांगितले. रिक्षा व टॅक्सी चालक लाॅकडाऊनचे पालन करत आहेत. सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर, सॅनिटायझरने स्वच्छता आदी काळजी घेतली जात आहे. या स्थितीतही वाहतूक पोलिस नाहक टॅक्सी-रिक्षा चालकांवर अन्याय करत आहेत, असा आरोप केला जात आहे. 

ड्रायव्हिंग लायसन्स, जादा प्रवासी, चुकीच्या दिशेने वाहतूक, कोरोनाच्या काळातील नियमांचा भंग या कारणांमुळे रिक्षा व टॅक्सींवर दिवसभर कारवाई करण्यात आली. 
- मधुकर पांडे, सहपोलिस आयुक्त, वाहतूक

शुक्रवारी सुमारे 30 टक्के म्हणजे 60 हजार रिक्षा रस्त्यांवर उतरल्या होत्या, मात्र मोठ्या प्रमाणात चालकांवर कारवाई करण्यात आली. प्रवासी अत्यावश्यक सेवेतील की सामान्य नागरिक आहे, यावरून घोळ होत आहे. 
- शशांक राव, कामगार नेते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US National Debt : अमेरिकेवर कर्जाचा डोंगर! पहिल्यांदाच राष्ट्रीय कर्ज ४० ट्रिलियन डॉलर पार; जगातील महासत्तेसमोर मोठे आर्थिक संकट?

Congress Lok Sabha: लोकसभेच्या जागा २५ वर्षांसाठी गोठवा; काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची मागणी, देशातील आठशे शहरांत ‘छात्रों की गूंज’

मध्यप्रदेशातून बंदुका आणून ५० हजारांत विकणारा सांगलीचा तरूण जेरबंद! मध्यप्रदेशसह माढा, पंढरपूर, सांगोला, आटणी तालुक्यातील ८ जण अटक, १७ गावठी बंदुका जप्त, वाचा...

Maharashtra weather update : महाराष्ट्रात पावसाला पोषक हवामान नाही? कमी दाबाचे क्षेत्र गुजरातकडे; IMDचा अंदाज

Beed Municipal Council : बीड नगरपालिकेत ‘आपसातच’ जुंपली; ठरावातील फेरबदलावरून उपनगराध्यक्ष अन् सभापती भिडले

SCROLL FOR NEXT