Robbery crime sakal media
मुंबई

डोंबिवली: मिरची पावडर फेकत रिव्हॉल्वरचा धाक दाखवून व्यावसायिकाला लुटलं

शर्मिला वाळुंज

डोंबिवली : व्यावसायिकाच्या अंगावर मिरची पावडर (chilly powder) फेकून रिव्हॉल्वरचा धाक दाखवून (Revolver threatening) दोघा लुटारूंनी त्यांच्याकडील बॅगेतील सव्वा पाच लाखाची रोकड लुटून नेल्याची (Five lac robbery) घटना उघडकीस आली आहे. कल्याण शीळ रोडवर 27 फेब्रुवारीला रात्री 10.45 च्या सुमारास ही घटना घडली असून याप्रकरणी व्यावसायिक किशोरमल काररा (वय 49) यांनी मानपाडा पोलिस ठाण्यात (Manpada police station) दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

रिजन्सी अनंतम येथे राहणारे किशोरमल हे 27 फेब्रुवारीला रात्रीच्या वेळेस दुचाकीवरुन प्रवास करीत होते. कल्याण शीळ मार्गावरील नेकणीपाडा बस स्टॉप जवळ ते आले असता तेथे दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी त्यांची दुचाकी अडवली. त्यांच्या अंगावर मिरची पावडर फेकून दुचाकीवर मागे बसलेल्या व्यक्तीने रिव्हॉल्वर दाखवून गोली चल जायेगा, बॅग निकाल के दे असे धमकावून खांद्याला अडकवलेली बॅग जबदरस्तीने खेचून पळून गेले आहेत.

बॅगमध्ये 5 लाख 35 हजार 50 रुपयांची रोकड असल्याची तक्रार किशोरमल यांनी मानपाडा पोलिस ठाण्यात दिली आहे. याचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक अनिल भिसे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Agricultural News : कांदा दराच्या पडझडीवरून नाफेडचे अधिकारी धारेवर; राज्य सरकारची कडक भूमिका

Amit Shah : युवकांना अमली पदार्थांपासून वाचवा, गृहमंत्री अमित शहा यांचे आवाहन; कठोर दृष्टिकोन बाळगा

CM Devendra Fadnavis : महाराष्ट्रातील एक कोटी महिलांना लखपती बनविणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

Airport Jobs 2025: फ्रेशर्ससाठी आनंदाची बातमी! एअरपोर्टवर विविध पदांची भरती सुरु; जाणून घ्या अर्ज करण्याची अंतिम तारीख

Raj Thackeray : पुराणमतवाद्यांना शिंगावर घेणारे आजोबा! राज ठाकरेंनी शेअर केला प्रबोधनकरांसोबतचा लहानपणीचा फोटो; जयंतीनिमित्त सांगितली आठवण

SCROLL FOR NEXT