Thief 
मुंबई

Video : बाप्पा, आशीर्वाद असू दे, मी चोरी करतोय!

सकाळ वृत्तसेवा

​मुंबई : गणेशोत्सव सुरू असल्याने अनेक गणेशभक्त रात्री उशिरा गणपती बाप्पाचं दर्शन घेतात. तसाच तो ही आला. त्याने पाहिलं आणि बाप्पाचं दर्शन घेऊन मंडपात झोपलेल्या गणेशभक्तांच्या मोबाईलवर हात साफ केला. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्या चोराचा तपास सुरू झालाआहे.

गणेशोत्सवानिमित्त अनेक गणेशभक्त दर्शनासाठी बाहेर पडत आहेत. याच संधीचा फायदा घेत अनेक गणेशभक्तांच्या किंमती वस्तूंवर हात साफ करण्याचे प्रकार वाढले आहेत. रात्रीच्या सुमारास दर्शन घेण्यासाठी मोठ्या गणेशोत्सव मंडळांत भक्तांची रेलचेल असते. तर अनेक छोट्या गणेश मंडळांमध्ये रात्री शुकशुकाट असतो. याचाच फायदा भुरटे चोर घेत आहेत. ज्या गणपती मंडळात शुकशुकाट असतो, त्या ठिकाणी भुरट्या चोरांचा वावर वाढला असून ते मंडपात झोपलेल्या मंडळाच्या कार्यकर्त्यांचे मोबाईल, पैसे, दागिने अशा किमती वस्तूंची चोरी करत आहेत. 

असाच एक प्रकार चिराबाजार भागातील गणेशोत्सव मंडळात घडला आहे. चिराबाजारातील ताडवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा कार्यकर्ता रात्री झोपलेला असताना चोरट्याने त्याच्या खिशातून मोबाईल लंपास केला. मात्र, या चोराचा हा कारनामा तिथे लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाल्याने हा सर्व प्रकार उघडकीस आला. त्या प्रकरणाचा पुढील तपास स्थानिक पोलिस करत असून गणेशभक्तांसह मंडळाच्या कार्यकर्त्यांनी योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : ‘वोट चोर, गद्दी छोड़’ या व्हिडिओवर बंदी घालणार नाही; सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

'सावळ्या मुलींना पाहण्यासाठी मुलगा आला की घरातील गोऱ्या मुलींना लपवायचे'; दिग्दर्शकाने सांगितला बालपणीचा अनुभव

Latest Marathi News Live Update: मुंबई गोवा महामार्गावरील अंजणारी पुलावर ठाकरे सेनेचे आंदोलन प्रकरणी १२० पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

Eknath Shinde: शिवसेनेची ताकद वाढली! अनेक पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश, शेकापला धक्का

IND vs NZ, 2nd Test: '... तर मग सिराजचा खरंच फॉर्म हरवलाय', अश्विनचा भारताच्या Playing XI निवडीवरून खोचक पोस्ट

SCROLL FOR NEXT