Third Interpol Young Global Police Leaders program sakal
मुंबई

Mumbai News : तिसऱ्या इंटरपोल यंग ग्लोबल पोलिस लीडर्स कार्यक्रमाची मुंबईत सांगता

तिसऱ्या इंटरपोल यंग ग्लोबल पोलिस लीडर्स कार्यक्रमाचा मुंबईत समारोप झाला.

सकाळ वृत्तसेवा

तिसऱ्या इंटरपोल यंग ग्लोबल पोलिस लीडर्स कार्यक्रमाचा मुंबईत समारोप झाला.

मुंबई - तिसऱ्या इंटरपोल यंग ग्लोबल पोलिस लीडर्स कार्यक्रमाचा मुंबईत समारोप झाला. या कार्यक्रमात 44 देशांतील 59 प्रतिनिधींना डिजिटल विश्वातील गुन्ह्यांविरुद्धच्या लढ्यात जागतिक सहकार्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. इंटरपोल यंग ग्लोबल पोलिस लीडर्स कार्यक्रमाच्या समारोप सत्राला सीबीआयचे संचालक सुबोध कुमार जैस्वाल यांनी संबोधित केले. यावेळी त्यांनी जागतिक व्याप्ती असलेल्या गुन्हेगारीसंदर्भात पोलिस संस्थांमध्ये आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवण्याच्या तातडीच्या गरजेवर भर दिला. आपल्या भाषणात, त्यांनी पोलिस दलाचे नेतृत्व करणाऱ्या युवकांना नम्रता आणि व्यापक आंतरराष्ट्रीय दृष्टीकोन असलेले नेतृत्व गुण आत्मसात करण्यासाठी प्रोत्साहित केले.

तिसरा इंटरपोल यंग ग्लोबल पोलिस लीडर्स कार्यक्रम हा युवा पोलिस नेत्यांसाठी एक महत्वाकांक्षी इंटरपोल नेतृत्व कार्यक्रम असून भारताने 25 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2023 दरम्यान राजधानी दिल्ली, गुजरात आणि भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत याचे आयोजन केले होते. 44 देशांतील 59 प्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय पोलिस लिडर्सच्या पुढच्या पिढीला आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन आणि वैश्विक आकलन या दृष्टीने एकत्र आणणे आणि त्यांना सक्षम बनवणे हा यामागचा उद्देश आहे.

आंतरराष्ट्रीय आणि गुंतागुंतीच्या वाढत्या गुन्ह्यांचा सामना करताना, अधिकार क्षेत्र आणि प्रशिक्षण यामधील भागीदारी हे पोलिसांसाठी महत्त्वपूर्ण साधन ठरेल. या पार्श्वभूमीवर, जागतिक गुन्ह्यांच्या तपासामध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी आणि/किंवा टिकवून ठेवण्यासाठी संकल्पनांची ओळख, विश्लेषण, कल्पना करणे, आंतरराष्ट्रीय सहकार्याचे महत्त्व आणि याचे प्रवर्तक म्हणून तसेच जागतिक जाळे उभारण्यातली इंटरपोलची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

या कार्यक्रमामुळे सहभागी झालेल्यांना पोलीस व्यवस्थेतील उदयोन्मुख कल, कायद्याची अंमलबजावणी करताना भेडसावणाऱ्या वाढत्या समस्या, नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करण्याची गरज आणि वाढत्या डिजिटलीकरणाच्या युगात गुन्हेगारीविरोधात लढा देणे याविषयी व्यापक चर्चेतून मार्गदर्शन मिळाले. कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या अन्य संस्थांबरोबरच धोरणकर्ते, शैक्षणिक संस्था, तंत्रज्ञान कंपन्या आणि इतर खाजगी संस्थांबरोबर सहकार्य वाढण्याची गरज असल्याचे अधोरेखित करण्यात आले. इंटरपोलचे महासचिव जुर्गन स्टॉक यांनी देखील दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थितांना मार्गदर्शन केले.

या 9 दिवसांच्या कार्यक्रमादरम्यान, सहभागी झालेल्यांना भारतीय पोलिसांची समृद्ध व्यावसायिक क्षमता, नवोन्मेष आणि त्यांनी विकसित केलेल्या सर्वोत्तम पद्धतींची माहिती देण्यात आली, ज्यामुळे त्यांच्या संबंधित देशांमध्ये त्यांना त्याचे अनुकरण करता येईल. या उपक्रमाने विश्वगुरु भारताच्या भावनेने पोलीस क्षेत्रात आंतरराष्ट्रीय क्षमता निर्माण करण्यात योगदान देण्याचा प्रयत्न केला.

भारतातील त्यांच्या वास्तव्यादरम्यान, जागतिक स्तरावरील या युवा पोलिसांनी प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला हजेरी लावली; राष्ट्रीय पोलीस स्मारकावर श्रद्धांजली वाहिली; सीबीआय मुख्यालय, ग्लोबल ऑपरेशन्स सेंटर, दिल्ली पोलीस मुख्यालयाला भेट दिली आणि राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागार, विशेष सचिव (अंतर्गत सुरक्षा), केंद्रीय गृह मंत्रालय; सीबीआय संचालक आणि सीबीआयचे इतर वरिष्ठ अधिकारी यांच्याशी संवाद साधला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Thalapathy News: विजय थलपतींनी २०२६च्या तामिळनाडू निवडणुकीबाबत केली मोठी घोषणा!

Rajgad News : वेल्हे तालुक्याचे नामकरण राजगड तालुका; ढोल ताशांच्या गजरात राजगडच्या मावळ्यांचा जल्लोष

Asia Cup 2025: 'श्रेयस, जैस्वाल, सिराज पाकिस्तानमध्ये असते, तर...' भारतीय संघातून वगळल्यानंतर माजी क्रिकेटपटूचं मोठं विधान

Thane News: काँग्रेसच्या माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश; पदाधिकाऱ्यांच्या पक्षत्यागावर संतोष केणेंचा माजी आमदारांवर थेट आरोप, म्हणाले...

Maharashtra Latest News Update: माटुंगा पोलिसांच्या थरारक कारवाईत दरोड्यातील मुख्य आरोपी अटक

SCROLL FOR NEXT