मुंबई

तिसऱ्या लॉक डाऊनच्या पहिल्या दिवशी मुंबईत 'ही' आहे कोरोना परिस्थिती...  

सकाळवृत्तसेवा

मुंबई :  मुंबईत आज  ही तब्बल 510 नवे रुग्ण सापडले आहेत, त्यामुळे मुंबईतील एकूण रुग्णांचा आकडा नऊ हजाराच्यावर पोहोचला आहे. तर आज ही तब्बल 18 जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 361 वर पोचला आहे. नव्या रुग्णांची संख्या आज ही वाढल्याने मुंबईत चिंता कायम असल्याचे दिसते .

आज मुंबईत 510 नवे कोविड पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने रुग्णांची संख्या 9123 झाली आहे. आज  सापडलेले सर्व रुग्ण आज दाखल झाले असल्याचे सांगण्यात येते. आज झालेल्या 18 मृत्यूंपैकी 10 जणांना दीर्घकालीन आजार होते. तर 3 जणांचा मृत्यू वार्धक्याशी संबंधीत आहे. आजच्या एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 14 पुरुष तर 4 महिलांचा समावेश होता. मृत झालेल्या रुग्णांपैकी 2 जाणंचे वय  40 च्या खाली होते. एकाचे वय 40च्या वर होते तर 9 रुग्णांचे वय 60 वर्षा वर होते. तर 7 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते. मुंबईतील मृतांचा एकूण आकडा 343 झाला आहे. आज एकूण 436 नवे संशयित रुग्ण सापडले असून आतापर्यंत 11,900 संशयित रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरी या आजारातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही वाढत आहे. आज 104 रुग्ण बरे झाले असून आज पर्यंत 1908 रुग्णांना घरी सोडण्यात आले.मुंबई व मुंबई उपनगर रेड झोनमध्ये आल्याने व तिथे काही गतीविधी सुरू झाल्याने नागरिकांनी सर्व मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिबंधित क्षेत्रात कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी विशेष क्लिनिक सुरू करण्यात आले आहेत. या 255 विशेष क्लिनिक मध्ये 11592 लाभार्थीचे सर्वेक्षण करण्यात आले असून त्यापैकी 3713 संशयितांचे नमुने घेण्यात आले. त्यातील 853 रुग्ण पॉझिटिव्ह आल्याची माहिती पालिकेने दिली.

third lockdown day one more than five hundred corona positive patients increased in mumbai

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajeev Karandikar Debate : ईव्हीएम प्रकरण न्यायालयात; मशीन हॅक करता येते की नाही या प्रश्नावर राजीव करंदीकर काय म्हणाले? जाणून घ्या

छत्तीसगडमध्ये सहा नक्षलवाद्यांचा खातमा! या सर्वांवर मिळून होतं सुमारे ४८ लाखांचं बक्षीस

T20 World Cup: टीम इंडियाची बार्बाडोसच्या बीचवर दंगा मस्ती; विराट अन् रिंकू तर...; पाहा Video

धक्कादायक! एअर इंडियाच्या विमानात प्रवाशाच्या जेवणात आढळलं ब्लेड! विमान कंपनीनं मान्य केली चूक

Ravindra Waikar : वायकरांच्या मतदारसंघात खरंच निकाल बदलला का? मतमोजणीच्या दिवशी नेमकं काय घडलं? कीर्तिकरांनी सांगितला घटनाक्रम

SCROLL FOR NEXT