मुंबई, 07 : नेरुळ येथे राहणारे 65 वर्षीय कृष्णकांत अय्यर ( वय 65 नाव बदललेले आहे ) हे दीड महिन्यापूर्वी प्रोस्टेटच्या सौम्य वाढीच्या तसेच मूत्रमार्गाची तक्रार घेऊन नेरुळ नवी मुंबईच्या तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल आणि रिसर्च सेन्टरमध्ये दाखल झाले होते.
सखोल वैद्यकीय तपासणी नंतर कृष्णकांत यांच्या डाव्या बाजूच्या किडनीच्यावर असलेल्या एड्रेनल ग्रंथीला 11 सेंटीमीटर व्यासाचा ट्यूमर आढळून आला. या प्रकारच्या ट्यूमरला एड्रेनल एंजियोमायोलिपोमा असे नाव असून हा ट्यूमर फारच दुर्मिळ असून अशा प्रकारचे फक्त 20 रुग्ण याआधी जगामध्ये आढळून आले आहेत. अशा रुग्णांमध्ये अनियंत्रित उच्च रक्तदाब असल्यामुळे आणि बायोकेमेस्ट्री फिओक्रोमोसाइटोमा नावाच्या अतिशय घातक रोगाची लक्षणे असल्यामुळे हा ट्युमर काढताना मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. कृष्णकांत यांचे वय पाहता ही शल्यचिकित्सा फारच धोकादायक होती.
महत्त्वाची बातमी : मुंबईकरांचं आणि मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाचं प्रेम पडलंय धूळ खात, आठ कोटींचा होतोय चुराडा
याविषयी अधिक माहिती देताना तसेच या रुग्णावर शस्त्रक्रिया करणारे तेरणा स्पेशॅलिटी रुग्णालयाचे युरोलॉजी आणि अॅन्ड्रोलॉजी सल्लागार, डॉ. निशांत कठाळे यांनी सांगितले, " एंजियोमायोलिपोमा हा बेनाइंगच्या जातकुळीतील ट्युमर असून हा गुळगुळीत स्नायू पेशी, जाड-भिंतींच्या रक्तवाहिन्या आणि चरबीयुक्त टीशूमध्ये आढळून येतो.
एंजियोमायोलाइपोमा सामान्यत: मूत्रपिंडात आणि यकृताच्या अतिरिक्त-भागात आढळून येतो. मात्र, आंत्रावरणाच्या पाठीमागच्या बाजूला स्पीन म्हणजेच प्लीहामध्ये हाडे, फुफ्फुस; अंडाशय किडनीच्या ग्रंथीला आढळणारा ट्यूमर अत्यंत दुर्मिळ आहे. हा दुर्मिळ ट्युमर कृष्णकांत यांच्या डाव्या मूत्रपिंडाच्यावर, मोठ्या आतड्यांमागे होता, एड्रेनल ग्रंथीला तसेच स्वादुपिंड आणि प्लीहाला चिकटला असल्यामुळे तो काढणे हे एक वैद्यकीय आव्हानच होते आण हे आव्हान तेरणा स्पेशालिटी रुग्णालयातील डॉक्टरांच्या टीमने सहज पार केले.
भारतीय वैद्यकीय अभिलेखानुसार, 2007 आणि 2014 मध्ये अनुक्रमे 2 रुग्णांना असाच ट्यूमर आढळला असून 2020 मध्ये तेरणा स्पेशालिटी रुग्णालयामध्ये आढळलेले हे तिसरे रुग्ण आहे. तसेच, जगामध्ये फक्त 20 रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया झाल्या आहेत. या रुग्णाचे ऑपरेशन झाल्यानंतर त्यांना दोन दिवस आयसीयु मध्ये ठेवले होते आणि त्यानंतर पाच दिवसांनी त्याना घरी सोडण्यात आले. अशा प्रकारच्या कठीण आणि दुर्मिळ शस्त्रक्रिया नियमितपणे नवी मुंबईतील तेरणा स्पेशॅलिटी रुग्णालय अँड रिसर्च सेंटरमध्ये केल्या जात असून कोरोना संक्रमण काळात किडनी, यकृत व ह्रदय संबंधित अनेक शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या आहेत."
कोरोना संक्रमण काळात अनेक नागरिकांनी उपचार व शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या आणि त्यामुळे अनेक आरोग्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. पण, तेरणा स्पेशालिटी रुग्णालय व रिसर्च सेंटरमध्ये कोरोना असलेल्या व कोरोना नसलेल्या रुग्णांसाठी वेगळे वॉर्ड तयार केले होते आणि या काळातही तेरणा रुग्णालयाच्या डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया केल्या आहेत. मात्र, आजही अनेक नागरिक कोरोनाच्या भीतीने घराबाहेर पडत नाहीत आणि त्यामुळे शरीरातील आजार वाढून अनेक गंभीर तक्रारी निर्माण होत आहेत, अशी माहिती तेरणा स्पेशालिटी रुग्णालयाचे युरोलॉजी आणि अॅन्ड्रोलॉजी सल्लागार डॉ. निशांत कठाळे यांनी दिली.
third rare operation of conducted successfully in terna hospital of navi mumbai
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.