Omicron Virus esakal
मुंबई

मुंबईत वेगाने पसरलेली तिसरी लाट त्सुनामी सारखीच !

मुंबईत वेगाने पसरलेली तिसरी लाट हा ओमिक्रॉनचा 90 ते 95 टक्के परिणाम आहे. जिनोम सिक्वेसिंगशिवाय रुग्ण दुपटीचा दर चाचण्यांमधून दिड ते तीन दिवसांवर आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबईत वेगाने पसरलेली तिसरी लाट हा ओमिक्रॉनचा 90 ते 95 टक्के परिणाम आहे. जिनोम सिक्वेसिंगशिवाय रुग्ण दुपटीचा दर चाचण्यांमधून दिड ते तीन दिवसांवर आला आहे.

मुंबई - मुंबईत वेगाने पसरलेली तिसरी लाट (Third Wave) हा ओमिक्रॉनचा (Omicron) 90 ते 95 टक्के परिणाम आहे. जिनोम सिक्वेसिंगशिवाय रुग्ण (Patient) दुपटीचा दर चाचण्यांमधून दिड ते तीन दिवसांवर आला आहे. म्हणजे रुग्णसंख्या झपाट्याने वाढत (Increase) आहे. शिवाय, पूर्वी कोविड बाधित असलेले तसेच लसीकरण (Vaccination) झालेल्यांनाही या विषाणूची बाधा होत आहे. बाधितांच्या कान नाक घशात ओमिक्रॉन सर्वाधिक घात करत आहे. तो फुप्फसात जात नाही. डेल्टाबाबत हर्ड इम्युनिटी आली होती मात्र ओमिक्रॉन बाबत तसे दिसून येत नाही. त्यामुळे ओमिक्रॉन व्हेरियंटचा सध्या असलेला संसर्ग त्सुनामी (Tsunami) लाटेप्रमाणे गंभीर आहे असे राज्य कोरोना टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी यांनी स्पष्ट केले आहे. 

या तिसऱ्या लाटेत सर्वाधिक प्रभाव ओमिक्रॉनचा आहे. कारण,हा व्हायरस झपाट्याने वाढत आहेत. तीव्र आजार होत नसला तरी 5 ते 10 टक्के नागरिकांमध्ये डेल्‍टा संसर्ग आहे आणि लसीकरण न झालेल्यांमध्ये गंभीर स्थिती आहे.  त्यांचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. रुग्णालयात किती रुग्ण संख्या दाखल आहे त्यातील कोविडमुळे आणि कोविडसह सहव्याधी असलेले किती आहे हे शोधणे गरजेचे आहे.

त्यातही गंभीर रुग्णांना ऑक्सिजनची गरज किती आहे? दुसऱ्या लाटेच्या तुलनेत या लाटेत ऑक्सिजनचा वापर कमी होत आहे तरीही गेल्या दोन आठवड्यांपासून त्याचा वापर वाढला आहे. पुढच्या दोन आठवड्यांत किती वापर आणि परिणाम होईल? याबाबतचे चित्र स्पष्ट होईल. त्यामुळे, चाचण्यांच्या दरापेक्षा एचपीआर म्हणजेच हॉस्पिटल पॉझिटिव्हीटी रेट यासह ऑक्सिजनची किती गरज आहे? आणि व्हेंटिलेटर दर किती आणि मृत्यूदर किती आहे? या बाबींवर शासनाने जास्त लक्ष केंद्रित केले गेले आहे.

सध्या सरकारने शुन्य मृत्यू दर आणि संसर्गाची तीव्रता कमी व्हावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. लसीकरणाने आजाराची तीव्रता कमी होते, मास्किंग करणे गरजेचे आहे, कारण, हा हवेतून संसर्ग राहणार आहे. यासह सर्दी-ताप खोकला अशी जरी लक्षणे असली तरी आयसोलेट केले पाहिजे यातुनच हा संसर्ग कमी करण्यात मदत होईल असेही डॉ. जोशी यांनी सांगितले.

मुंबईचा आलेख स्थिर-

सध्या मुंबईचा आलेख स्थिरावलेला दिसतो. निर्बंध लागल्याने नागरिक घरी आहेत, त्यातुन घरी केलेल्या चाचण्यांचा अहवाल रिपोर्ट केला जात नाही शिवाय, आरटीपीसीआर आणि अँटीजेन चाचण्यांचे प्रमाण ही कमी आहे त्यामुळे रुग्ण संख्या स्थिर झालेली दिसते. चाचण्या न केल्यामुळेही जे मुंबईचे सध्याचे चित्र आहे स्पष्ट होत नसून नागरिकांनी गाफिल राहू नये काळजी घेतलीच पाहिजे असे आवाहन ही डॉ. जोशी यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: प्रशिक्षक रिकी पाँटिंगनेच दिलेला वर्चस्व गाजविण्याचा सल्ला, कुपर कोनोलीनं स्पष्टच केला खुलासा

अल्लू अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी राबवला अनोखा उपक्रम ! मुलींसाठी HPV लसीकरण मोहिमेची सुरुवात

Viral status Thackeray group : ‘उद्धवरावांची उद्‌ध्वस्त सेना’ ठाकरेंच्या प्रमुख नेत्याच्या स्टेटसने चर्चा, ५ मिनीटात डिलीटही केलं

Akola News: शहरातील ३५ पाण्याच्या टाक्यांची होणार दुरुस्ती; चार झोनमध्ये पाणीपुरवठा व्यवस्थापनाचे नियोजन

Nanded Crime: माहूर तालुक्यातील बंद खडी केंद्रावरील गिट्टी साठा बेकायदेशीर; एक कोटी ९९ लाखाचा दंड, तहसीलदारांची कारवाई!

SCROLL FOR NEXT