omicron  Sakal
मुंबई

ठाणे जिल्ह्यात १३ हजार नागरिकांची परदेशवारी

ओमिक्रॉननंतरही भ्रमंती सुरूच

सकाळ वृत्तसेवा

ठाणे : ओमिक्रॉनचा (omicron) पहिला रुग्ण कल्याण-डोंबिवलीत सापडल्यानंतर खळबळ उडाली होती. अजूनही परदेश वारी करणाऱ्यांची संख्या ठाणे जिल्ह्यात कमी होताना दिसत नाही. २८ नोव्हेंबरपासून १२ हजार ८२० नागरिक परदेशवारी करून ठाणे (Thane) जिल्ह्यात परतले आहेत, अशी माहिती शासकीय आकडेवारीवरून समोर आली. सुदैवाने दुसरा ओमिक्रॉन (omicron) रुग्ण अद्यापही जिल्ह्यात आढळून आलेला नाही. यामध्ये सर्वाधिक ४,३६७ नागरिक हे ठाणे महापालिका (Thane Municipal Corporation) हद्दीतील आहेत. त्याचबरोबर अन्य ठिकाणीही जिल्ह्यातील ६५४ ठाणेकर नागरिकांची नोंद झाली आहे.

राज्यात ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण डोंबिवलीत आढळल्यानंतर राज्य शासनाने परदेशातून येणाऱ्या नागरिकांची विमानतळावर तपासणी सुरू केली. परदेशातून आलेल्या नागरिकांची विमानतळावर तपासणी केल्यानंतर त्या नागरिकांची आठ दिवसांनी पुन्हा अँटीजेन चाचणी केली जात आहे. त्यामध्ये पॉझिटिव्ह आल्यावर त्यांची आरटी-पीसीआर चाचणी केली जाते. त्यामध्ये पॉझिटिव्ह आल्यावरच त्याचे जीनोम सिक्वेसिंग तपासणी केली जाते. त्याच्यानंतर तो ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आहे की नाही, हे स्पष्ट होते.

२८ नोव्हेंबरपासून आतापर्यंत १२,८२० नागरिक परदेशवारी करून ठाणे जिल्ह्यात परतले आहेत. त्यामध्ये १२,१६६ हे नागरिक थेट जिल्ह्यात परतलेले आहेत. परदेशातून आल्यावर मुंबईत ८१, पालघर ४८६, रायगड ८२ आणि इतर ठिकाणी ५ असे ६५४ ठाणे जिल्ह्यातील नागरिकांची नोंद आहे.

प्रशासकीय यंत्रणा सज्ज

आरटी-पीसीआर निगेटिव्ह आल्यावर तपासणी करण्याची गरज नसल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. मात्र परदेशातून आलेल्या नागरिकांना काही लक्षणे आढळल्यास त्यांचे तातडीने विलगीकरण केले जाते. याबाबत जिल्हा शासकीय यंत्रणेने विशेष खबरदारी घेतली आहे.

परदेशवारी करणाऱ्यांची आकडेवारी

  • ४,३६७ - ठाणे शहर

  • १,८७२ - कल्याण-डोंबिवली

  • ६९४ - ठाणे ग्रामीण

  • २,७४६ - नवी मुंबई

  • १,७२१ - मीरा-भाईंदर

  • ४५९ - उल्हासनगर

  • ३०७ - भिवंडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat प्रकरणात मोठा स्फोट! 58 नाही तर, 100+ व्हिडिओ असल्याची माहिती उघड, ‘तांत्रिक’ शोषणाचा काळाकुट्ट खेळ समोर

IPL 2026 Marathi News: बाळासोबत वेळ घालवायचाय... ७ सामने नाही खेळू शकणार स्टार गोलंदाज... नियमानुसार होणार बंदीची कारवाई?

Ashok Kharat Case : "सावित्रीची लेक जिथे भोंदू पावलांवर वाकली...." अमोल कोल्हेंची रुपाली चाकणकर यांच्यावर बोचरी टीका

दिवसभर ACमध्ये बसता? तुमची इम्युनिटी कमी होतेय का? काय काळजी घ्यावी जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : घनसावंगी तालुक्यात मुसळधार पाऊस आणि गारपीट, शेतकऱ्यांचे नुकसान, भरपाईची मागणी

SCROLL FOR NEXT