russia ukraine war sakal media
मुंबई

युक्रेनमध्ये रायगडमधील फक्त एकच विद्यार्थी; ३१ जणांना १० दिवसांत मायदेशात आणलं

सकाळ वृत्तसेवा

अलिबाग : युद्ध परिस्थितीमुळे युक्रेनमध्ये (Russia and Ukraine war) अडकलेल्या रायगड जिल्ह्यातील (Raigad) ३२ विद्यार्थ्यांपैकी ३१ जणांना १० दिवसांत मायदेशात (31 Student evacuated) आणण्यात यश आले आहे. पेण तालुक्यातील कल्पित मढवी (Kalpit Madhavi) आता एकमेव विद्यार्थी सुमी शहरात अडकला आहे. त्यालाही लवकरच भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

रायगड जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी दरवर्षी शिक्षणासाठी युक्रेनमध्ये जातात. युद्ध सुरू झाल्यापासून ३२ जण या देशात अडकले. काही जण पूर्वी कोरोना कालावधीत भारतात आले होते. ते पुन्हा युक्रेनमध्ये गेले होते.

हे विद्यार्थी कोणत्या शहरात आहेत, याची माहिती त्यांच्या पालकांनी देण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले होते. त्यानुसार भारत सरकारने यातील ३१ विद्यार्थ्यांना परत मायदेशात सुखरूप आणले. कल्पित मढवी हा आता एकमेव विद्यार्थी त्या देशात अडकला आहे. त्यालाही लवकरच मायदेशात आणण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Railway: बीडकरांची ४० वर्षांची स्वप्नपूर्ती! उद्यापासून अहिल्यानगर ते बीड 'रेल्वे'सेवेला सुरुवात; काय आहेत वैशिष्ट्ये?

Maratha Reservation: १९९४ चा जीआर नेमका काय आहे? मराठा समाज आरक्षणाबाहेर राहिला, कारण...

Latest Marathi News Updates: भाजपमध्ये घराणेशाही नाही- देवेंद्र फडणवीस

Pachod News : चौकशीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांच्या धमकीने घाबरलेल्या शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन संपविले जीवन

कोकणातलं तुम्हाला काय आवडलं? दिलीप प्रभावळकर म्हणाले, 'ते पाहून मीच चकीत झालो कारण...

SCROLL FOR NEXT