मुंबई

कोरोनातून बरे झालेल्या 30 टक्के लोक पाचन समस्येनं त्रस्त

भाग्यश्री भुवड

मुंबई: कोरोनातून बरे झालेल्या रूग्णांमध्ये साधारणतः खोकला, ताप, अंगदुखी, मेंदूविकार, थकवा जाणवणं आणि श्वास घेण्यास अडचणी येणं अशी लक्षणे दिसून येतात.  अतिसार, अपचनाची समस्या, यकृताची सूज, रक्तातील सारखेचं प्रमाण कमी होणं आणि स्वादुपिंडातील समस्या उद्भवू लागल्या आहेत. मात्र, पोस्ट कोविड रूग्णांमध्ये आढळून येणाऱ्या या लक्षणांपासून लोकांना फारशी माहिती नसल्याने त्याकडे दुर्लक्ष केले जाते. अंदाजित कोरोनावर यशस्वी मात करून ठीक झालेल्या 30 टक्के वयोवृद्धांमध्ये पाचन समस्या दिसून येत आहे. तर तरूणांमध्ये अतिसाराची सौम्य लक्षणे पाहायला मिळत आहेत.

कोरोनामुक्त झाल्यानंतरही काही रूग्णांमध्ये पोस्ट कोविड समस्या जाणवत आहेत. यात अनेक रूग्णांमध्ये मेंदूशी संबंधित विकार होत असल्याची अनेक प्रकरण समोर आली होती. पण आता बऱ्याच रूग्णांमध्ये पाचन संस्थेशी संबंधित आजार त्रास देत असल्याचे दिसून येत आहे.

मुंबईत राहणाऱ्या 30 वर्षीय निशा खन्ना (नाव बदललेले आहे) या कोरोनातून सुखरूप बाहेर पडल्या. पण काही महिन्यानंतर अचानक त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याने या महिलेला तातडीने चेंबूरच्या झेन रूग्णालयात दाखल करण्यात आले.
तिची साखरेची पातळी 40 मिलीग्रॅम / डीएल होती. त्यामुळे, रक्तदाब खूपच कमी झाला होता. वैद्यकीय तपासणीत या महिलेला ऑटोइम्यून रिस्पॉन्स नावाच्या दुर्मिळ आजार असल्याचे निदान झाले. या आजारामुळे शरीरात इन्सुलिन हे अतिरिक्त प्रमाणात तयार होते. त्यामुळे या महिलेला डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते. तब्येतील सुधारणा व्हावी, यासाठी तीन महिने तिला तीन महिने नियमित पाठपुरावा करण्यास सांगण्यात आले होते. कारण या महिलेची साखरेची पातळी 30 मिलीग्रॅम / डीएलच्या खाली आली असती तर जीवावर बेतू शकले असते. त्यामुळे, कोरोना व्हायरसमुळे श्वसन प्रक्रियेवर नव्हेतर पाचन संस्थेवरही परिणाम होत आहे.

यकृताला सूज येण्याच्या प्रकरणांमध्ये वाढ

चेंबूरच्या झेन मल्टिस्पेशालिटी रूग्णालयाचे संचालक आणि गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. रॉय पाटणकर यांनी सांगितले की, ‘‘अनेक रूग्णांमध्ये यकृताला सूज येण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यातच स्वादुपिंडात इन्सुलिन गरजेनुसार तयार होत नसल्याने शरीरातील सारखेचं प्रमाण अनियमित होते. यामुळे मूत्रपिंडावर विपरित परिणाम होऊ शकतो.”

योग्य आहार महत्त्वाचा

कोरोनातून बरे झाल्यानंतर पाचन समस्येचा त्रास जाणवत असलेल्या रूग्णांनी पुरेशी विश्रांती घ्यावी. जास्तीत जास्त द्रव पदार्थांचे सेवन करावेत. याशिवाय रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार व्हिटॅमिन सी, डी आणि पुरेसे कॅल्शियम शरीराला मिळेल अशा पदार्थांचा आहारात समावेश करावा. तळलेल्या पदार्थांचे सेवन करणे टाळावेत. याशिवाय आजाराचे वेळीच निदान होऊ गुतांगुत टाळण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने रक्तचाचणी करून घ्या. कोविडनंतर प्रत्येकाने श्वसनासंबंधित नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे. याशिवाय पाचन संस्थेच्या आरोग्यावरही लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे. यासाठी आहारात ताजी फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्य समाविष्ट करा. साखर आणि चरबीयुक्त पदार्थांचे सेवन मर्यादित करा आणि भरपूर पाणी प्या, असा सल्ला ही डॉ. पाटणकर यांनी दिला आहे.

----------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Thirty percent people recover corona heart disease suffer digestive problems

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT