मुंबई

ये हाथ नहीं हाथौडा है

विशेष म्हणजे नोकरी, व्यवसाय सांभाळून तरुणाई व्यायामाला वेळ देते.

प्रमोद जाधव

पीळदार शरीर ही रायगड जिल्ह्यातील तरुणांची आता वेगळी ओळख ठरत आहे. गावागावांमध्ये उभ्या राहिलेल्या व्यायामशाळा (जिम) याची साक्ष देतात. जिल्ह्यात ३०० पेक्षा अधिक व्यायामशाळा आहेत. त्याचाच परिणाम म्हणून ‘ये हाथ नही हातोडा है’ अशी ताकद दाखवणाऱ्या शरीरसौष्ठव स्पर्धांची संख्याही वाढलेली दिसते. विशेष म्हणजे नोकरी, व्यवसाय सांभाळून तरुणाई व्यायामाला वेळ देते.

मुंबई, पुणे यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये व्यायामशाळांचे मोठे महत्त्व आहे. या दोन्ही महानगरांसोबतच शेजार लाभलेल्या रायगड जिल्ह्यात व्यायामशाळांचा प्रसार वेगाने झालेला दिसतो. पाच वर्षांतील हा बदल आहे. चित्रपटांतील नायकांच्या पीळदार शरीरामुळे काही तरुणांनी प्रेरणा घेत व्यायामाचे धडे गिरवण्यास सुरुवात केली. बॉडी बिल्डर असोसिएशननेही यासाठी मेहनत घेतली. समाज माध्यमाद्वारे त्यांनी प्रोत्साहन दिले.

जिल्ह्यामध्ये पूर्वी मोजक्याच व्यायामशाळा होत्या. आता त्या गावागावांत पोहचल्या आहेत. आधुनिक पद्धतीची साधनसामग्री, योग्य आहार, मार्गदर्शनामुळे शरीरसौष्ठव स्पर्धेत सहभाग घेण्याचा कलदेखील मोठ्या प्रमाणात वाढला आहे. वेगवेगळ्या ठिकाणी तालुका श्री, ग्रामपंचायत श्री, रायगड श्री यांसारख्या शरीरसौष्ठव स्पर्धा मोठ्या प्रमाणात होत आहेत. या स्पर्धा पाहण्याबरोबर सहभाग घेणाऱ्यांची संख्यादेखील वाढू लागली आहे. त्यामुळे शरीरसौष्ठव स्पर्धेचा कल दिवसेंदिवस वाढत आहे. पीळदार शरीराचे हे तरुण मजबूत मनगटाच्या जोरावर विधायक कामातही अग्रेसर आहेत.

जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात ३०० पेक्षा अधिक व्यायामशाळा आहेत. आर्थिक प्रगतीमुळे दिवसेंदिवस त्यात लक्षणीय वाढ होत आहे.

वडिलांना शरीरसौष्ठव स्पर्धेची आवड होती. त्यामुळे फिटनेस सेंटरमध्ये जाऊन सुदृढ व पीळदार शरीर करण्यावर भर दिला. आहाराबरोबरच योग्य मार्गदर्शन मिळाल्याने रायगड श्री पासून महाराष्ट्र श्री टायटल विजेता ठरलो आहे. जिल्ह्यात आता शरीरसौष्ठव स्पर्धेचा ट्रेंड वाढला आहे. तरुणाई यामध्ये अधिक आकर्षित होऊ लागली आहेत. कोरोनानंतर आरोग्य चांगले ठेवण्याबरोबरच शरीरसौष्ठव स्पर्धेत सहभाग घेण्याचा कल वाढला आहे.

- अमित पाटील, महाराष्ट्र श्री टायटल विजेते

शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात अद्ययावत असे फिटनेस सेंटर ठिकठिकाणी सुरू झाले आहेत. समाज माध्यमांतील शरीरसौष्ठव प्रसारामुळे स्पर्धेबाबत आवड अधिक निर्माण होऊ लागली आहे. काही तरुण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वतःला घडवण्यावर लक्ष देऊ लागले आहेत. - प्रशांत जोशी, जोशी फिटनेस सेंटर

समाज माध्यमांद्वारे झालेली जागृती आणि सिनेअभिनेत्यांप्रमाणे दिसण्याच्या प्रेरणेतून अनेक तरुण पीळदार शरीर करण्याकडे लक्ष देत आहेत. पूर्वी उंचीनुसार शरीरसौष्ठव स्पर्धा घेतल्या जात होत्या. आता वजनानुसार स्पर्धा घेतल्या जात आहेत. त्यामुळेही अनेक तरुणांना स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळू लागली आहे. व्यायामामुळे तरुण व्यसनापासून दूर होण्यास मदत होते.

- किरण भगत, सहसचिव, रायगड जिल्हा बॉडी बिल्डर असोसिएशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Munciple Election 2025 : नागपूरमध्ये हायव्होलटेज ड्रामा! अर्ज मागे घेऊ नये म्हणून भाजप उमेदवाराला घरातच कोंडलं, आमदार परिणय फुके दाखल

Akol crime: अकोल्यात रेल्वेखाली उडी घेऊन प्रेमीयुगलानं संपवलं जीवन; सरत्या वर्षाला निरोप अन् उचलले टोकाचे पाऊल!

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये भाजपचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे गिरीश महाजन यांच्या भेटीला

India Squad For New Zealand ODIs : ऋतुराज गायकवाडचा पत्ता कट, मोहम्मद शमी पुन्हा दुर्लक्षित! भारताच्या वन डे संघात अचंबित करणारे निर्णय...

Daily Good Habits: मन फ्रेश अन् अ‍ॅक्टिव ठेवण्यासाठी डॉक्टरांनी सांगितलेला ‘हा’ कानमंत्र पाळा, तणाव होईल गायब

SCROLL FOR NEXT