Marriage  sakal media
मुंबई

यंदा उडवा दणक्‍यात बार; विवाहोच्छुकांसाठी ६२ मुहूर्त

शुभांगी पाटील

तुर्भे : भारतीय संस्कृतीत असलेल्या १६ संस्कारांतील विवाह संस्कार (Marriage) हा महत्त्वाचा विधी आहे. यंदा २१ नोव्हेंबरपासून २२ जुलै २०२२ पर्यंत तब्‍बल ६२ विवाह मुहूर्त असल्‍याने विवाहोच्छुकांचे (marriage auspicious moment) दणक्‍यात बार उडण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे शुभमंगल सावधान हे सूर सनई-चौघड्यांसह सर्वत्र गुंजणार आहेत. तुळशी विवाहाला (tulsi vivah) १६ नोव्हेंबरपासून प्रारंभ झाला असून १९ नोव्हेंबरला समाप्ती आहे. त्‍यानंतर दुसऱ्याच दिवसांपासून म्हणजे २० नोव्हेंबरपासून लग्नसराईला सुरुवात होत आहे.

त्यामुळे यंदा कापड बाजार व सराफा बाजार तेजीत राहणार आहेत. याशिवाय दुकानदार, बॅंडवाले, कॅटरर्स, आचारी, घोडेवाले, प्रवासी वाहने आदींचेही अच्छे दिन असल्याचे दिसून येते. गेल्‍या दीड-दोन वर्षांपासून कोरोनाच्या सावटामुळे रखडलेले अथवा स्‍थगित करण्यात आलेले विवाहांचे बार नोव्हेंबर ते जुलै महिन्यात दणक्‍यात उडण्याची शक्‍यता आहे.

यंदाच्या लग्नसराईत मार्च व मे महिन्यात ११ मुहूर्त आहेत. जवळपास सर्वच महिन्यांमध्ये विवाहाचा मुहूर्त आला आहे. त्यामुळे विवाहोच्छुक वधू-वरांना फेब्रुवारीनंतर एप्रिल महिन्यापर्यंत वाट पहावी लागणार नाही. दरवर्षी विवाह मुहूर्त निवडताना अनेकजण सुट्यांचा विचार करतात. त्यामुळे साधारणतः रविवारच्या मुहूर्तावर भर असतो. मे महिन्यात शासकीय सुट्या असतात. त्यामुळे नोकरदार क्षेत्रातील मंडळी या दिवसांना प्राधान्य देतात. मे महिन्यात सर्वाधिक विवाहाचे मुहूर्त आल्याने या महिन्यात लग्नाचा बार मोठ्या प्रमाणात उडणार आहे.

कोरोनामुळे प्रशासनाने प्रतिबंध लादल्याने लग्न समारंभावर उपजीविका असणाऱ्या घटकांवर उपासमारीची वेळ आली होती. पण आता चालू महिन्यापासून लग्नासाठी मोठ्या प्रमाणात तारखा उपलब्ध असल्याने संबंधितांना व्यवसाय तेजीत येण्याची शक्‍यता आहे. २० मार्च २०२० मध्ये कोरोनाच्या महामारीला सुरुवात झाली. पहिल्‍या लाटेतील लॉकडाउनमुळे अनेकांचे हाल झाले तर दुसऱ्या लाटेतील परिस्‍थिती ही पहिल्‍या लाटेपेक्षा भयानक होती. त्‍यामुळे अनेकांना मोजक्‍या नातेवाइकांच्या उपस्‍थितीत लग्न उरकावे लागले.

ज्यांनी दणक्‍यात लग्न सोहळे करण्याचा प्रयत्न केला, त्यांना कारवाईला सामोरे जावे लागले. मात्र सध्या कोरोना रुग्‍णसंख्या आटोक्‍यात आहे. प्रशासनाकडून नियम शिथिल करण्यात आल्‍याने दिवाळीच्या खरेदीत नागरिकांनी दीड-दोन वर्षातील कसर भरून काढली. आता तुलसी विवाह संपन्न झाल्यावर २१ नोव्हेंबर ते जुलै २२ या नऊ महिन्यात भरघोस लग्नाच्या तारखा उपलब्ध आहेत. त्‍यामुळे दोनाचे चार हात करणाऱ्यांसाठी ही संधी ‘सोने पे सुहागा’ अशीच म्‍हणावी लागेल.

सुगीचे दिवस येणार

पहिल्‍या लाटेत प्रशासनाने कठोर निर्बंध लागू केल्‍याने वाजंत्री, बेंजो पथकांना एकही सुपारी मिळाली नव्हती. विवाहोच्छुकांना घरगुती पद्धतीने लग्न उरकावे लागल्‍याने सभागृह, लॉन्स, केटरर्स, पार्लर, हारतुरे, मंडप डेकोरेटर्स आदी संबंधित व्यवसाय पूर्णतः ठप्प होते. तर जागरण, गोंधळ, वाघ्या मुरळी सादर करणारे लोककलावंतांचाही पोटापाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला होता. मात्र यंदा तब्‍बल ६२ विवाह मुहूर्त असल्‍याने या व्यावसायिकांना सुगीचे दिवस येण्याची शक्‍यता आहे.

लग्न समारंभाच्या तारखा

नोव्हेंबर
मुहूर्त ४ (ता.२०, २१,२९ ,३०)

डिसेंबर

मुहूर्त ११ (ता.१, ७, ८,९, ११, १९, २४, २६, २७, २८, २९,)

जानेवारी
मुहूर्त ५,(ता.२०, २२, २३, २७, २९)

फेब्रुवारी
मुहूर्त ५(ता.५, ६, ७, १०, १७)

मार्च
मुहूर्त ४ (ता. २५, २६, २७, २८)

एप्रिल
मुहूर्त ६ (ता.१५, १७, १९, २१, २४, २५,)

मे
मुहूर्त ११ (ता.४, १०, १३, १४, १८, २०, २१, २२, २४, २६, २७)

जून
मुहूर्त १० (ता.१, ६, ८, ११, १३, १४, १५, १६, १८, २२)

जुलै
मुहूर्त ६ (ता.३, ५, ६, ७, ८, ९)

"लग्न-सभारंभावर कोरोना संसर्गामुळे बंधने आली होती. त्यामुळे लग्न-सभारंभावर अवलंबून असणाऱ्या व्यावसायिकांची आर्थिक अडचण आली होती. त्याच प्रमाणे भटजींनाही आर्थिक मंदीचा फटका बसला होता. येत्या नऊ महिन्यात लग्नतारखा मोठ्या प्रमाणात आहेत. यामुळे नक्कीच फायदा होईल. तसेच लग्न समारंभानंतर असणाऱ्या विविध कार्यक्रमांमुळे आर्थिक सुबत्ता येईल."
- हेमंत जंगम, गुरुजी, कोपरखैरणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुण्यात वर्दळीच्या रस्त्यावर "ड्रंक अँड ड्राइव्ह"चा थरार; मद्यधुंद चालकाने आधी दुचाकीला धडक दिली अन् मग...

Latest Marathi News Live Update: माढा तालुक्यातील पूरग्रस्त १८ गावांना विविध समाजसेवी संस्थांकडून मदतीचा ओघ

Amit Shah: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार! अमित शहांनी राज्य सरकारने दिले मोठे आश्वासन, म्हणाले...

West Bengal Rains : पश्चिम बंगालमध्ये पावसाचा कहर; दार्जिलिंगमधील भूस्खलनात आतापर्यत १८ जणांचा मृत्यू, पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

INDW vs PAKW: पाकिस्तानी कर्णधाराने चालू सामन्यात स्प्रे मारला, नंतर सर्वच खेळाडूंना मैदानाबाहेर काढलं; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT