one plus 
मुंबई

बोलाच भात अन् बोलाचीच कढी; एकीकडे चीनी मालावर बहिष्काराच्या घोषणा आणि दुसरीकडे चीनी मोबाईलवर भारतीयांच्या उड्या...

सकाळवृत्तसेवा

मुंबई : भारत आणि चीन यांच्यात लडाखनजीकच्या गलवान खोऱ्यात झालेल्या झटापटीनंतर देशभरातून चिनी मालावार बहिष्कार टाकण्याची मागणी देशभरातून केली जात आहे. त्यासंदर्भात देशात ठिकठिकाणी निदर्शनेही केली जात आहे. एवढेच नव्हे तर मोबाईलमधील चीनी अॅपही अनइन्स्टॉल करण्याची मागणी जोर धरू लागली. एकीकडे चीनविरोधी ही मोहीम तीव्र होत असताना मात्र चीनी कंपनीच्या मोबाईल खरेदीसाठी भारतीय ग्राहकांच्या उड्या पडल्याचे दिसून आले. 

एका इंग्रजी संकेतस्थळाने दिेलेल्या वृत्तानुसार चीनी कंपनी वन प्लसच्या 'वन प्लस 8 प्रो'  या मोबाईलचा ऑनलाईन सेल गुरुवारी (दि.18) भारतात एका ई-कॉमर्स संकेतस्थळावर आयोजित केला होता. हा सेल सुरू झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच हा मोबाईल 'सोल्ड आउट' झाल्याचे म्हटले आहे. 

'वन प्लस 8 प्रो 5G' हो मोबाईल ऑनलाईन विक्रीसाठी अ‍ॅमझॉन आणि वन प्लसच्या अधिकृत संकेतस्थळावर गुरुवारी उपलब्ध करण्यात आला होता.  दुपारी 12 वाजता हा सेल सुरु झाला. मात्र, काही वेळातच हा मोबाईल सोल्ड आउट झाला. विशेषतः अॅपलच्या आयफोनशी स्पर्धा करू पाहणाऱ्या वन प्लसचा 'वन प्लस 8 प्रो 5G'हा मोबाईल भारतीय ग्राहकांच्या चांगलाच पसंतीस पडल्याचे दिसून आले. एकीकडे गलवान खोऱ्यात चीनसोबत झालेल्या संघर्षात भारताचे 20 जवान हुतात्मा झाल्याच्या पार्श्वभूमीवर चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मोहिम तीव्र होत असताना मात्र चीनी बनावटीचा फोन भारतातच काही मिनिटांतच विकल्या गेल्यामुळे समाज माध्यमांवर उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

अशाच प्रकारे यापूर्वी 29 मे रोजी वन प्लस 8 प्रो 5G या मोबईलचा ऑनलाईन सेल आयोजित केला होता. मात्र काही कारणास्तव तो रद्द करण्यात आला होता. त्यानंतर  15 जून रोजी पुन्हा सेल सुरु झाला तेव्हा हा मोबईल काही मिनिटांतच हातावेगळा झाल्याचे वृ्त्तात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Brazilian Model Larissa: मतदानातील '२२' चा मॅजिक! राहुल गांधींचा Viral Claim पाहून ब्राझिलियन मॉडेल म्हणाली, ‘ भारतात हे काय चाललंय?'

माेठी बातमी! 'मैत्रिणीचा खून केल्याचे सांगत तो पोलिस ठाण्यात हजर';मृतदेह टाकला नदीत, सांगली पाेलिस यंत्रणा हादरली

Gujarat Riots 2002 : गुजरात दंगलीतील तीन आरोपींची २३ वर्षांनी निर्दोष मुक्तता; अनेक साक्षीदारांचा मृत्यू , पुरावे गायब, तपास अधिकारीही...

धक्कादायक घटना! 'कुळकजाईत एकाचा खून'; मृतदेह शेतात नग्नावस्थेत, माण तालुक्यात उडाली खळबळ; नेमकं काय घडलं..

पोलिस भरतीत एका पदासाठी एकाच अर्जाचे बंधन! अर्जासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत; पहिल्यांदा मैदानी‌ नंतर एकाचवेळी लेखी परीक्षा; परीक्षेबद्दल वाचा सविस्तर...

SCROLL FOR NEXT