thousand brokers at MLA residence MLA own support common people are being cheated politics esakal
मुंबई

Mumbai : आमदार निवासात हजार दलालांचा ठिय्या

आमदारांच्याच पाठिंब्याची चर्चा : सर्वसामान्यांची होतेय फसवणूक

सकाळ वृत्तसेवा

- महेश जगताप

मुंबई : राज्यभरातील आमदारांसाठी मुंबईत हक्काचे घर म्हणून आमदार निवास असते. आमदारांचे कार्यकर्तेही व सामान्य नागरिकांसाठी मुंबईत आल्यास आमदार निवासात त्यांची सोय असते. मात्र हेच आमदार निवास आता मंत्रालयातील दलालांचे निवासस्थान म्हणून ओळखले जाऊ लागले आहे.

तब्बल एक हजार दलाल वेगवेगळ्या आमदार निवासांमध्ये वर्षानुवर्षे वास्तव्य करीत आहेत.विशेष म्हणजे या दलालांना तेथे राहण्यासाठी आमदारांचाच पाठिंबा असल्याची माहिती आमदार निवासामधील एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. स्थानिक पातळीवर काम होत नाही, म्हणून लोक मंत्रालयात येत असतात.

सुरक्षेचे कारण पुढे करून सर्वसामान्य जनतेला मात्र मंत्रालयात प्रवेश नाकारला जातो. दुपारी दोननंतरच त्यांना प्रवेश मिळतो. त्यासाठी पास घ्यावा लागतो. हा पास घेण्यासाठीही सकाळी नऊपासून रांगेत उभे राहावे लागते. मंत्र्यांची अतिमहत्त्वाची व्यक्ती म्हणून या दलालांना थेट प्रवेश पास दिला जातो.

तसेच त्यांना आत आणण्यासाठी बऱ्याच वेळा फाटकावर शिपाईही पाठवला जातो. हे दलाल सकाळी दहा वाजल्यापासून मंत्रालयात ठाण मांडून असतात. ते शेकडो कोटींची उलाढालही करतात. अनेक सामान्य नागरिकांना फसविण्याचे प्रकार करीत असतात.मंत्रालयात दिवसभर मुक्त वावरानंतर रात्री झोपण्यासाठी दलाल आमदार निवासाच्या आधार घेतात.

आमदारांची परवानगी घेतल्यानंतर आमदार निवासामध्ये फक्त तीन दिवस राहता येते. मात्र हे दलाल वर्षानुवर्षे आमदार निवासात राहत आहेत. त्यामुळे हे आमदार निवास आमदारांसाठी बांधले आहे की दलालांसाठी बांधले आहे, अशी चर्चा मंत्रालयात रंगत आहे. हे दलाल आमदारांच्या सहमतीने राहत असल्याने त्यांना बाहेर काढू शकत नसल्याची खंत आमदार निवासामधील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

मंत्रालयात दलालांचे काम

  • राज्य सरकारच्या विविध विभागातील निघणाऱ्या निविदांसाठी मध्यस्थी

  • अनेक आर्थिक बाबींच्या संबंधित फाइलचा पाठपुरावा

  • अनेक बड्या अधिकाऱ्यांची ओळख प्रस्थापित करून उद्योगपतींशी तडजोड करून देणे

  • अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी मंत्री, वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करणे

  • सरकारच्या भविष्यातील निर्णयाची माहिती संबंधित व्यक्तींना पुरवणे

हे उपाय शक्य

  • आठ दिवसांतून एक व्यक्ती मंत्रालयात किती वेळा येते हे तपासावे

  • आमदार निवासामध्ये वारंवार राहणाऱ्या व्यक्तीची तपासणी व्हावी

  • सरकारने या व्यक्तींवर कठोर कारवाई करावी

शेकडो कोटींची कमाई

मंत्रालयात लायझनिंग करणारी दलालांची मोठी साखळी गेल्या अनेक वर्षांपासून काम करीत असल्याचे बोलले जात आहे. यामध्ये वरिष्ठ अधिकारी, राज्यातील महत्त्वाचे नेते व काही उद्योगपतीही सामील असल्याचे बोलले जाते. या कामातून ही मंडळी शेकडो कोटी रुपयांची कमाई असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court Bench : पुणे येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुरु करण्याची आमदार कुल यांची अधिवेशनात मागणी

Nimisha Priya: तूर्तास फाशी टळली, आता पुढे काय? जाणून घ्या नेमकं काय आहे येमेनमधील निमिषा प्रिया प्रकरण

Latest Maharashtra News Updates : सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक भागवत कांबळे रंगेहाथ अडकले

Israel attacks Syria: इस्राईलकडून सीरियाच्या मंत्रालयावर हल्ला! लष्कराचे मुख्यालयही टार्गेट; हल्ल्याचं कारण केलं स्पष्ट

Mumbai Railway Station: स्थानकांवरील कामे तत्काळ पूर्ण करा, शिंदेसेना खासदारांचा रेल्वेला आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT