नवी मुंबईत हजारो कोटींच्या प्रकल्पांची उद्‌घाटने
नवी मुंबईत हजारो कोटींच्या प्रकल्पांची उद्‌घाटने 
मुंबई

नवी मुंबईतील हजारो कोटींच्या प्रकल्पांची उद्‌घाटने

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : बहुप्रतिक्षित मेट्रो चाचणी, सुमारे ९ हजार घरांची योजना, कोस्टल रोड आदी हजारो कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे पुढील आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन होण्याची दाट शक्‍यता आहे. विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता जाहीर होण्याआधीच हे सोपस्कार पार पाडण्यासाठी सिडकोच्या अधिकाऱ्यांची धावपळ सुरू आहे. या उद्‌घाटनांच्या धामधुमीत वाशी येथे तयार होणाऱ्या परिवहन उपक्रमाच्या पहिल्या-वाहिल्या वाणिज्य संकुलाचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उरकून घेण्याचे नवी मुंबई महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या विचाराधीन आहे. 

सिडकोतर्फे तळोजा, खारघर आणि बेलापूर अशा तीन शहरांना जोडणारी पहिल्या टप्प्यातील ११ कि.मी. मार्गावरील मेट्रो रेल्वेचे तब्बल ९५ टक्के काम पूर्णत्वास आले आहे. काही दिवसांपूर्वीच मेट्रोच्या दोन सब-स्टेशनला महावितरणतर्फे वीजपुरवठाही सुरू करण्यात आला. त्यामुळे गेल्या आठवड्यातच सिडकोने या मार्गावर डेपो ते पेंधर मेट्रो स्टेशनदरम्यान पहिली चाचणी घेतली होती. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर आता सिडकोच्या मेट्रो विभागात कार्यरत असलेल्या अभियंत्यांचा आत्मविश्‍वास अधिकच वाढला आहे. त्यामुळे या मार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्‌घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्याची महत्त्वाकांक्षा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांची आहे. त्यामुळे तळोजा कारशेड ते पेंधर या ३ कि.मी. दरम्यानच्या मार्गाचे उद्‌घाटन फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे. 

तळोजा प्रकल्पासोबतच शिवडी-न्हावाशेवा या सागरी सेतूला जोडणारा सागरी मार्गदेखील सुमारे ६८१ कोटी रुपये खर्च करून सिडकोतर्फे तयार केला जात आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन फडणवीस यांच्या हस्ते करण्याचा सिडकोचा प्रयत्न आहे. या मार्गाच्या विकासामुळे उरणकरांची रोजच्या वाहतूक कोंडीतून सुटका होणार असून, प्रवास अधिक गतिमान होणार आहे. या प्रकल्पानंतर फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ९० हजार घरांच्या प्रकल्पापैकी ७ हजार ९०५ नवीन घरांची योजना फडणवीस यांच्या हस्ते जाहीर केली जाणार आहे. यात काही जुन्या प्रकल्पातील शिल्लक राहिलेल्या एक हजार ३४४ घरांचा समावेश आहे. याखेरीज सिडकोने कळंबोली येथे तयार केलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन व कामोठे येथे तयार केलेले समाजमंदिर या दोन इमारतींचे लोकार्पणही फडवीस यांच्या हस्ते उरकण्याची सिडकोच्या अधिकाऱ्यांची कल्पना आहे. 

अडकलेले प्रकल्प मार्गी लागणार
नवी मुंबई महापालिका ही या उद्‌घाटनांच्या लगीनघाईत आपले अडकलेले प्रकल्प मार्गी लावण्याचा विचार करीत आहे. महापालिकेतर्फे तयार करण्यात आलेले तब्बल ८ प्रकल्प उद्‌घाटनांअभावी रखडले आहेत. यापैकी वाशी येथे पहिल्यांदाच परिवहन उपक्रमामार्फत तयार केल्या जाणाऱ्या वाणिज्य संकुलाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्याचे विचाराधीन असल्याचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी सांगितले.

सिडकोच्या अधिकाऱ्यांनी मोठे श्रम घेऊन वेळेत तयार केलेल्या अनेक प्रकल्पांचे उद्‌घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याकरिता व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या माध्यमातून फडणवीस यांना आमंत्रण दिले आहे. परंतु त्यांच्या वेळेनुसार कार्यक्रमाचा दिवस निश्‍चित केला जाईल.
- संजय चौटालिया, मुख्य अभियंता, सिडको.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT