Thousands of unemployed turned up in walk in interview at Air India Airport Services Ltd  esakal
मुंबई

बेरोजगारांची वारी कुठे गेली सरकारी गॅरंटी? मुंबईत नोकरीसाठी चेंगराचेंगरी; लोटला हजारोंचा जनसागर, गर्दीचा video viral

Unemployment News: एअर इंडियाच्या 'एअरपोर्ट लोडर'च्या भरतीदरम्यान मुंबई विमानतळावर चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली

सकाळ डिजिटल टीम

एअर इंडियाच्या 'एअरपोर्ट लोडर'च्या भरतीदरम्यान मुंबई विमानतळावर चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओनंतर सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेली गॅरंटी कुठे गेली? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

मुंबईत कलिना येथे एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड मध्ये वॉक-इन मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. या मुलाखतीसाठी मोठ्या प्रमाणात बेरोजगार तरुण पाहायला मिळाले. 600 पदांसाठी 25,000 हून अधिक अर्जदारांनी येथे हजेरी लावली होती. अर्जदार फॉर्म काउंटरपर्यंत पोहोचण्यासाठी एकमेकांना धक्काबुक्की करत असल्याचे व्हिडीओमध्ये पाहायाला मिळत आहे.

मुंबई विमानतळावरील एअर इंडिया ग्रुप मार्फत कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी आज परीक्षेचा आयोजन करण्यात आलं होतं सकाळी साडेआठ वाजता या परीक्षेसाठी हजारो परीक्षार्थीची मुंबई विमानतळ परिसरात गर्दी झाली.

तरुणांची ही गर्दी हाताळतांना विमानतळ प्रशासनाच्या नाकी नऊ आले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने अर्जदारांना त्यांचे बायोडेटा जमा करून परिसर सोडण्यास सांगण्यात आले.

काही दिवसांपूर्वी अशीच परिस्थीती गुजरातमध्ये पाहायाल मिळाली होती. भरूचमध्ये अंकलेश्वर येथील हॉटेलमध्ये खासगी कंपनीने नोकरीसाठी मुलाखती ठेवल्या होत्या. तिथे प्रचंड गर्दी उसळली. चेंगराचेंगरी आणि रेटारेटी झाली. त्यात रेलिंग कोसळून अनेक जण जखमी झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली.

मुंबईतील आणि गुजरातमध्ये झालेली घटना पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्षाला दोन कोटी रोजगार निर्माण करण्याची दिलेली गॅरंटी बोगस निघाल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडमध्ये कसोटी सामना पाहून भारावला, गिलबद्दलही बोलला; लक्ष्मणमुळे U19 टीम इंडियाला मिळाला स्पेशल अनुभव

पन्नाशीतही फिट दिसण्यासाठी ऐश्वर्या नारकर फॉलो करतात हे रुटीन ; "कढीपत्त्याचं पाणी आणि डाएटिंग..."

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Yeola Railway Station : येवला रेल्वे स्थानकाची पाहणी; ४ प्रमुख गाड्यांना थांबा देण्याची मागणी

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

SCROLL FOR NEXT