Mantralay News sakal
मुंबई

Threat Call: मंत्रालय कक्षाला धमकीचा फोन; एक-दोन दिवसात अतिरेकी कारवाईची धमकी, एकाला अटक

मंत्रालय नियंत्रण कक्षातील लँडलाईनवार धमकीचा फोन

अंकिता खाणे (Ankita Khane)

मुंबईतील मंत्रालय नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन आल्याची माहिती समोर आली आहे. येत्या एक ते दोन दिवसात अतिरेकी हल्ल्याची धमकी या फोनद्वारे देण्यात आली आहे. मंत्रालयातील नियंत्रण कक्षात हा फोन आला होता.

या फोननंतर मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत. एक-दोन दिवसात अतिरेकी हल्ल्याची धमकी या फोनच्या माध्यमातून देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंत्रालयातील नियंत्रण कक्षाला हा धमकीचा फोन आला. एक दोन दिवसात अतिरेकी हल्ला करण्याची धमकी या फोनद्वारे देण्यात आली आहे. काल (सोमवारी रात्री १० वाजता) मंत्रालय नियंत्रण कक्षातील लँडलाईनवर हा धमकीचा फोन आला आहे.

अतिरेकी हल्ला नेमका कोणत्या ठिकाणी होणार याचं स्थळ धमकीच्या फोनमध्ये सांगण्यात आलेलं नाही. धमकीचा फोन येताच याची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. यानंतर मुंबई पोलीस सतर्क झालेत. धमकीचा कॉल ट्रेस करण्याचे काम सुरू आहे. तसेच तपासात कांदिवली येथून एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं आहे.

धमकीच्या फोनमध्ये खरंच काही तथ्य आहे का? याची पडताळणी मुंबई पोलीस करत आहेत. दोन दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांना देखील धमकीचा फोन आला होता. मुंबई लोकल ट्रेनमध्ये साखळी बॉम्बस्फोट करण्याची धमकी यावेळी देण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC: धक्कादायक! भारताच्या प्रमुख खेळाडूला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले... सर्व खेळाडू तिच्याभवती जमले, चिंता वाढवणारी घटना

Portugal vs Congo DR : ख्रिस्तियानो रोनाल्डो 'म्हातारा' झाला... सहावा वर्ल्ड कप खेळणाऱ्या सुपरस्टारसोबत नेमकं काय घडलं ते वाचा...

T20 World Cup, IND vs NED : भारतीय संघाचा सर्वात मोठा विजय, नेदरलँड्सला चारली धूळ! शफाली वर्माची बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही कमाल

IND A vs AFG A: आधी बॉल हातातून सुटला, पण वैभव सूर्यवंशीने मागे वळून हवेत झेपावत घेतला अफलातून झेल, पाहा Video

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई! पुणे विद्यापीठाच्या मेसचा परवाना रद्द, गंभीर त्रुटी निदर्शनास आल्याची माहिती

SCROLL FOR NEXT