Sanjay Raut  
मुंबई

Shashikant Warishe Death : "तुमचाही शशिकांत वारीसे करु" ; संजय राऊत यांना धमकीचे फोन

सकाळ डिजिटल टीम

Shashikant Warishe Death : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना धमकीचे फोन आले आहेत. पत्रकार वारीसे यांच्या हत्येचा मुद्दा उचलाल तर तुमचाही शशिकांत वारीसे करु, अशी धमकी संजय राऊत यांना केली आहे. राऊत यांना स्वत: ही माहिती दिली आहे. 

वारीसे यांच्या कुटुंबाला भेटायला न जाण्याची ताकीद देखील संजय राऊत यांना देण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणाची चौकशी करा, अशी मागणी संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली आहे. 

संजय राऊत म्हणाले,  शशिकांत वारीसे यांचा विषय उचलू नका म्हणून मला धमकी आली. या प्रकरणी मला सतत फोन येत आहेत. मात्र मी भित नाही, मी जाहीरपणे हा विषय हाती घेतला आहे. मी कोकणात जाणार आहे. 

रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार इथल्या प्रस्तावित रिफयनरीला विरोध करणाऱ्या पत्रकार शशिकांत वारीसे यांचं हत्या प्रकरण सरकारला अडचणीचं ठरणार आहे. संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका विधानामुळं वारीसे यांची हत्या झाल्याचा गंभीर आरोप केला आहे.

संजय राऊत म्हणाले, "स्थानिकांचा या रिफायनरीला विरोध आहे. त्यामुळं शिवसेना त्यांच्या पाठिशी आहे. पण जेव्हापासून राज्यातील सरकार बदललं आहे. या राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री लोकांना वारंवार धमकावत आहेत की कोणत्याही परिस्थित आम्ही रिफायनरी इथं घेऊन येणारचं. जर याला विरोध कराल तर तो विरोध आम्ही मोडून काढू. अशा प्रकारच्या धमक्या जर सरकारकडून दिल्या जात असतील तर त्या ठिकाणचे जे गुंड आहेत त्यांना बळ मिळेल"

"पंधरा दिवसांपूर्वी त्याठिकाणी अंगणेवाडी इथं एक देवीची यात्रा पार पडली. मुंबईहून हजारो लोक या यात्रेला जातात. या ठिकाणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर सभेत विधान केलं की, रिफायनरी आम्ही घेऊन येऊ कोण रोखतंय ते पाहू. त्यांच्या या विधानानंतर २४ दिवसांनी रिफायनरीला विरोध करणारा युवा पत्रकार शशीकांत वारीसे यांची निर्घृण हत्या झाली. या अर्थ काय आहे? हा केवळ एक योगायोग नाहीए. या हस्तेमागं मोठा कट आहे, मी काय बोलतोय हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चांगलच माहिती आहे. आजवर कोकणात २५ वर्षात जेवढ्या राजकीय हत्या झाल्या आहेत त्यात या घटनेचाही समावेश आहे," असा आरोपही यावेळी राऊत यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT