एनएमएमटी बसमध्ये धुडगूस घालणाऱ्या तिघांना अटक
एनएमएमटी बसमध्ये धुडगूस घालणाऱ्या तिघांना अटक 
मुंबई

एनएमएमटी बसमध्ये धुडगूस घालणाऱ्या तिघांना अटक

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : नेरूळ रेल्वे स्टेशन ते बामण डोंगरी या मार्गावरील एनएमएमटी बसमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास घुसलेल्या तिघा मद्यधुंद तरुणांनी बसमधील वाहकाला व प्रवाशांना शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे या तिघांना पकडण्यास आलेल्या पोलिसांनादेखील त्यांनी हेल्मेटने मारहाण करून जखमी केल्याचे समोर आले आहे. राहुल कांबळे (२४), आकाश जावळे (२३) आणि ऋषिकेश पवार (२२) अशी या तिघांची नावे असून, नेरूळ पोलिसांनी त्यांच्यावर मारहाणीसह सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक केली.
 
अटक करण्यात आलेले तिघे तरुण उलवे व पनवेल भागात राहण्यास असून, मागील मंगळवारी (ता.५) मध्यरात्री हे तिघे मद्यधुंद अवस्थेत नेरूळ रेल्वे स्टेशन ते बामण डोंगरी या मार्गावरील १७ क्रमांकाच्या एनएमएमटी बसमध्ये बसले. या वेळी तिघे बसमधून पुढील दरवाजाने चढत असल्याने वाहक केतन चव्हाण यांनी त्यांना पाठीमागील दरवाजाने बसमध्ये चढण्यास सांगितले. या गोष्टीचा त्यांना राग आल्याने त्यांनी वाहक चव्हाण यांना शिवीगाळ करून, लाथा-बुक्‍क्‍यांनी मारहाण केली. त्यामुळे बसचालक व तेथील रिक्षाचालक आणि बसमधील प्रवाशांनी त्या तिघांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, या तिघांनी त्यांनाही शिगीगाळ करून धमकी दिली. या वेळी बसमधील प्रवाशांनी या तिघांना मारहाण करण्यास सुरुवात केल्याने त्यांनी त्या ठिकाणावरून पलायन केले. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असता, त्यांनी हेल्मेटने पोलिस नाईक पाटील यांच्या तोंडावर मारून त्यांना जखमी केले. या तिघांनी मद्यधुंद अवस्थेत धुडगूस घातल्याने नेरूळ पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT