three arrested in ulhasnagar snatching case
three arrested in ulhasnagar snatching case 
मुंबई

मॉर्निंगवॉकच्या वयोवृद्ध महिलांचे दागिने खेचणाऱ्या तडीपारासह तिघांना बेड्या

दिनेश गोगी

उल्हासनगर- मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या वयोवृद्ध महिलांना टार्गेट करून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने धूनस्टाईलने खेचून मोटरसायकलवर पळ काढणाऱ्या एका तडीपारासह तिघांना बेड्या ठोकण्याची कामगिरी उल्हासनगर गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी केली आहे. त्यांच्या कडून 116 ग्रॅम वजनाचे दागिने, मोटरसायकल व तीन मोबाईल असा सव्वा पाच लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. गुन्हे अन्वेषणचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांनी ही माहिती आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

गेल्या काही महिन्यापासून बदलापूर पश्चिम, अंबरनाथ, शिवाजी नगर, विठ्ठलवाडी, मध्यवर्ती, हिलपोलीस ठाण्याच्या हद्दीत मॉर्निंगवॉक जाणाऱ्या वयोवृद्ध महिलांचे दागिने धुमस्टाईलने खेचून मोटरसायकल वरून सुसाट पळ काढण्याच्या घटना सातत्याने घडत असल्याने महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. त्यात अंबरनाथ मधील एका तडीपार गुंडाचाही समावेश असल्याची माहिती मिळाली होती.त्या अनुषंगाने ठाणे येथील वरिष्ठ पोलीस अधिकारी व सहाय्यक पोलीस आयुक्त बाजीराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मनोहर पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज सालगुडे, श्रीकृष्ण नावले, उपनिरीक्षक गणेश तोरगल, सहाय्यक उपनिरीक्षक उदय पालांडे, रामसिंग चव्हाण, सुरेंंद्र पवार, राजकुमार सौदागर, भारत नवले, सुनील जाधव, किशोर महाशब्दे,गुरुनाथ जंगम, गोरखनाथ जाधव आदींनी अंबरनाथ मधील तडीपार राजा उर्फ अंडाराजा(26), साहिल गुप्ता 19 (खेडेगोळवली कल्याण पूर्व) व अब्बासी सैय्यद 18 (अंबिवली) यांना विविध ठिकाणी सापळा रचून ताब्यात घेतले. अंडाराजा व साहिल यानी 9 व अब्बासी याने 2 असे 11 गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून सोन्याचे मंगळसूत्र, चैन, मोबाईल व एक मोटरसायकल असा सव्वा पाच लाख रुपयांच्यावर ऐवज जप्त करण्यात आला आहे.

अब्बासी याला न्यायालयीन कष्टडी मिळाली असून अंडाराजा आणि साहिल यांना 5 सप्टेंबर पर्यंत पोलीस कष्टडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांनी पत्रकारांना सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance: मोदी सरकार आरोग्य विम्यावरील जीएसटी कमी करण्याच्या तयारीत; ग्राहकांना होणार थेट फायदा

Jonty Rhodes IPL 2024 : बॉल बॉयचा भन्नाट कॅच... टिप्स देणाऱ्या जाँटीने थोपटली पाठ; Video व्हायरल

Jharkhand ED Raid : 15 हजार पगार, 10 हजार लाच.. अन् घरात सापडले 30 कोटी; नोकराच्या घरातली कॅश कुणाची? 'या' मंत्र्यांचं कनेक्शन?

Latest Marathi News Update : गडचिरोलीत CRPF चे सर्च ऑपरेशन, मिळाले विस्फोटकांनी भरलेले सहा प्रेशर कुकर

Summer Health Care : उन्हाळ्यात अशक्तपणाचा वाढतोय धोका.! कसा करावा उष्माघातापासून बचाव ?

SCROLL FOR NEXT