Crime eSakal
मुंबई

Navi Mumbai Crime: तुर्भे परिसरातून तीन बांगलादेशी महिलांना अटक

सकाळ वृ्त्तसेवा

नवी मुंबई, ता. २७ (वार्ताहर) : तुर्भे येथील के. के. आर. रोड टेकडी भागात बेकायदा वास्तव्यास असलेल्या तीन बांगलादेशी महिलांना तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.

या महिला काही महिन्यांपासून या ठिकाणी मजुरी व घरकाम करून बेकायदा वास्तव्य करीत असल्याचे चौकशीत आढळून आले आहे.

तीन बांगलादेशी महिला के. के. आर. रोड टेकडी परिसरात बेकायदा वास्तव्यास असल्याची माहिती मिळाल्याने तुर्भे विभागाचे सहायक पोलिस आयुक्त राहुल गायकवाड यांनी या बांगलादेशी नागरिकांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.

त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांच्या सूचनेनुसार पोलिस पथकाने शनिवारी सकाळी या परिसरात एका घरावर छापा टाकत रेखा अनिस शेख (वय ४०), प्रिया अब्दुल शेख (वय ४०) व शिखा अब्दुल शेख (वय ६०) या तीन महिलांना ताब्यात घेतले. अधिक चौकशीत त्यांनी बांगलादेशातील गरिबीला कंटाळून घुसखोरीच्या मार्गाने भारतात प्रवेश केल्याचे सांगितले. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून या तिघींना अटक करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs RCB: पांड्या ब्रदर्समध्ये वाद? कृणालने आधी हार्दिकला बाऊन्सर मारला अन् आऊट होताच असं काही केलं की...

Hydrogen Cooking Stove India : गॅस किंवा रॉकेलची गरज नाही, चक्क पाण्यावर चालतो 'हा' स्टोव्ह, मात्र किंमत ऐकून बसेल धक्का!

Satara Crime: आरफळच्या युवकाचा खून; सातारा तालुक्यात उडाली खळबळ, नवरा-बायकाे शेतामध्ये काम करत अन् अचानक काय घडलं!

Dr Babasaheb Ambedkar : 'या' मोठ्या घटनेनंतर डॉ. आंबेडकरांनी दिली होती रायगडाला ऐतिहासिक भेट, एक दिवस केला होता मुक्काम

"कॅन्सरचे उपचार सुरु असतानाही त्याने.." मराठी अभिनेत्याने उघड केली रमेश भाटकरांची अखेरची इच्छा; म्हणाले..

SCROLL FOR NEXT