Deadbody found in vasai sakal
मुंबई

Vasai News : वसईत बंद घरात कुजलेले तीन मृतदेह सापडले; गॅस गळतीने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज

वसईत बंद घरात तिघांचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने एकाच खळबळ उडाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

नालासोपारा - वसईत बंद घरात तिघांचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने एकाच खळबळ उडाली आहे. माणिकपूर पोलिसांनी घटनास्थळावरीन तिन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन साठी पाठविले आहेत. वसईच्या नवपाडा परिसरात आज रविवार ता 04 रोजी सायंकाळी 5 च्या सुमारास ही घटना उघड झाली आहे. घरातील गॅस गळतीमुळे ही घटना घडली असल्याचा पोलिसांनी प्राथमिक अंदाज वर्तविला आहे. मात्र खरी घटना काय याचा तपास माणिकपूर पोलीस करीत आहेत.

आजम, राजू, छोटकू अशी प्राथमिक नाव मयताची समोर आली असून, हे तिघेही वसईच्या आनंद नगर परिसरात फळविक्री करत असल्याचे सांगण्यात येत आहे. वसई पश्चिमेच्या नवपाडा परिसरातील आशा चाळ येथे दुस-या मजल्यावरील घरातून सकाळपासून उग्रवास येत असल्याने तेथील रहिवाशांनी आज दुपारी माणिकपूर पोलिसांना तक्रार केली होती.

पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन पाहणी केली असता, घरातून प्रचंड प्रमाणात दुर्गंधी येत होती. दार बंद असल्याने शेवटी पोलिसांनी खिडक्यांच्या काचा फोडून, आत मध्ये प्रवेश केला असता तीन मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आले आहेत. मृतदेहाच्या शरीरावर कोणत्याही जखमा नव्हत्या. घरात गॅसचा उग्र वास ही येत होता.

प्राथमिक अंदाजानुसार या घरामध्ये गॅस चालू राहिला असावा, आणि या बंद घरात ऑक्सिजनची कमतरता भासल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. माञ शवविच्छेदन अहवालानंतरच मयताच नक्की कारण कळेल. सध्या पोलिसांनी मृतदेह शवविच्छदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. उशिरापर्यंत तरी मयतांचे कुणी नातेवाईक समोर आले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT