मुंबई

धक्कादायक! ठाण्यातील महिलेला एकाच वेळी लशींचे तीन डोस

नामदेव कुंभार

ठाणे : एकाच दिवशी २२ हजार लशींचे डोस दिल्याचा विक्रम ठाणे महापालिकेने सोमवारी नोंदवला असतानाच एका महिलेला एकाच वेळी तीन लशींचे डोस दिल्याचा ‘पराक्रम’ही उघडकीस आला आहे. ब्रह्मांड परिसरात राहणाऱ्या या महिलेला त्रास जाणवू लागल्यानंतर हा प्रकार समोर आला. दरम्यान, ठाणे महापालिकेने या महिलेचा आरोप फेटाळला असून तिला तीन डोस नव्हे तर तीन वेळा सुई टोचल्यामुळे त्रास होत असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे ठाण्यातील लसीकरण पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.

ठाणे महापलिकेच्या आनंदनगर लसीकरण केंद्राकर 25 जून रोजी 28 वर्षीय महिलेला एकाच वेळी तीन डोस दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर घडला आहे. सध्या या महिलेची प्रकृती स्थिर असून पालिका डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली आहे. एकाचवेळी तीन डोस देण्याची निष्काळजीपणा करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. याबाबत समिती नेमली असून आम्ही चौकशी करत आहोत, असं महानगरपालिकेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

एकाचवेळी तीन डोस दिल्याने ही महिला घाबरली होती. लसीकरण केंद्रावरुन घरी परतल्यानंतर आपल्यासोबत झालेला संपूर्ण प्रकार पतीला सांगितला. त्यानंतर स्थानिक नगरसेविकेला हा प्रकार कळताच त्यांनी याबाबत संबंधित अधिकाऱ्याला विचारले परंतु त्यांच्याकडून त्यांना उडवाउडवीची उत्तरं मिळाली. जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न ठाणे महापालिकेचे अधिकारी आणि डॉक्टर करत असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Govt Targets Hospital Bills: खाजगी रुग्णालयांच्या लुटीला ब्रेक? सरकारचा मोठा निर्णय; उपचार खर्च होणार स्वस्त!

जनगणनेतील घरयादीत ३४ प्रश्‍न; काय आहेत प्रश्न, 'या' वेबसाईटवर जाऊन करता येणार जनगणना

महाबळेश्वर ते फिल्मसिटी! कुठे-कुठे झालं 'राजा शिवाजी' सिनेमाचं भव्य शूटिंग?

IPL 2026: राजस्थान रॉयल्सच्या परदेशी खेळाडूवर BCCI कडून मोठी कारवाई; LSG विरुद्ध सामन्यातील चूक पडली महागात

Women Reservation Bill : महिला आरक्षण विधेयकांतर्गत मतदारसंघांची पुनर्रचना करून जागा वाढविण्याचा प्रस्ताव होता; काय म्हणाले मंत्री रामदास आठवले?

SCROLL FOR NEXT