मुंबई

भाजपचे तीन माजी  नगरसेवक शिवसेनेत  आमदार गणेश नाईक यांना धक्का 

सुजित गायकवाड

नवी मुंबई  : आमदार गणेश नाईक यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे दिघ्यातील नवीन गवते, अपर्णा गवते आणि दीपा गवते या तीन माजी नगरसेवकांनी अखेर भाजपला रामराम केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी गवतेंनी शिवबंधन बांधले. यापूर्वीदेखील पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे गवतेंना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू होते. पालिका निवडणुकीला काही महिने शिल्लक राहिले असतानाच गवतेंच्या शिवसेना प्रवेशामुळे शिवसेनेने नाईकांना मोठा धक्का दिल्याची चर्चा आहे. 

गणेश नाईकांच्या निकटर्तीयांमध्ये नवीन गवते कुटुंबीयांचा समावेश आहे. तीन वेळा गवते दिघ्यातून नगरसेवक राहिले आहेत. दिघा अनधिकृत बांधकामप्रकरणी गवतेंचे नाव समोर आले होते. याप्रकरणी अडचणीच्या काळात नाईकांनी गवतेंचा हात सोडल्यामुळे गवतेंना एकट्याने खिंड लढवावी लागली होती. तेव्हापासूनच गवतेंच्या मनात नाईकांबद्दल दुरावा निर्माण झाला होता. त्यामुळे गवतेंना आपल्या गळाला लाण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षातील मातब्बर नेते मंडळी प्रयत्न करत होती. अखेर शिवसेनेला यात यश आले. आज संध्याकाळी उद्धव ठाकरे यांनी गवतेंच्या हातावर शिवबंधन बांधले. या वेळी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे. खासदार राजन विचारे, सचिव मिलिंद नार्वेकर, परिवहन मंत्री अनिल परब, माजी नगरसेवक एम. के. मढवी आणि करण मढवी उपस्थित होते. 

शिवसेनेची ताकत वाढली! 
नवीन गवते यांच्या शिवसेनेतील प्रवेशामुळे ऐरोली आणि दिघा परिसरात शिवसेनेची ताकद वाढली आहे. पालिका निवडणुकीला काही दिवस शिल्लक राहीले असताना गवतेंनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे आता या ठिकाणी भाजपला उपेदवार शोधावा लागणार आहे

Three former BJP corporators enter in Shiv Sena

=----------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मानवतेला धक्का देणारी घटना! पतीसोबत भांडण झाल्यावर आईने 6 वर्षाच्या मुलाला केलं मगरीच्या हवाली

Nashik Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीसाठी 2192 वाहनांचा शोध सुरू; 4 हजार 800 मतदान केंद्रे

MI vs SRH IPL Playoffs : टेन्शन फ्री मुंबई वाढवणार हैदराबादच्या ह्रदयाचे ठोके, एक हार अन् खेळ खल्लास?

Latest Marathi News Update : निवडणूक जिंकले तर अभिनय सोडणार- कंगना

Google Ads Policy: डीपफेक पॉर्न बनवणाऱ्या अ‍ॅप्सवर गुगल करणार सर्जिकल स्ट्राईक, कडक केले जाहिरातीचे नियम

SCROLL FOR NEXT