मुंबई

कोरोना लढ्यात तीन विश्वसुंदरीही पुढे सरसावल्या! जनजागृतीची मोहीम घेतली हाती

सकाळ वृत्तसेवा

मुंबई: कोरोना विषाणूची जनजागृती करण्यासाठी दररोज कलाकार पुढे येत आहेत. प्रत्येक कलाकार आपापल्या पद्धतीने जनजागृती करत आहेत. कोणी कविता म्हणत तर कोणी गाणं गात कोरोना विषाणूची जनजागृती करत आहेत. अशातच तीन विश्र्वसुंदरी देखील कोरोना विषाणूची जनजागृती करण्यासाठी पुढे आल्या आहेत.  2016 साली विश्र्वसुंदरीचा किताब जिंकलेली स्टेफनी डेल, 2017 साली विश्र्वसुंदरीचा किताब जिंकलेली मानुषी छिल्लर, 2018 साली विश्र्वसुंदरीचा किताब जिंकलेली वेनेसा पॉन्स या तिघीही कोरोना विषाणूची जनजागृती करण्यासाठी आणि हळूहळू वाढणाऱ्या या विषाणूशी वाचण्यासाठी जगभरातील जनतेसोबत चर्चा करण्यासाठी एकत्र आल्या आहेत.

याबाबत बोलताना मानुषी म्हणाली की, 'अशा कठीण काळात आपल्यातील देशांमध्ये आणि समुदायांमध्ये कोरोना विषाणूबद्दल जास्तीत जास्त जनजागृती करण्यासाठी जे करता येईल ते आम्ही करण्याचा प्रयत्न करू. यामुळे विषाणूचा प्रसार रोखण्यास मदत होईल. मला लोकांना सांगायचं होतं की या कठीण काळात आपण सर्व एकत्र आहोत. अनेकांचं नुकसान होतंय हे पाहून दुःख होतंय, भारतीयांची परिस्थितीही जगभरातील सर्वच देशांप्रमाणे आहे. मेक्सिको आणि प्यूटरे रिको यांचीही परिस्थिती ही आपल्या सारखीच आहे. आम्ही तिघीही या विषयांवर चर्चा करणार आहोत.'


मानुषी छिल्लर ही भारतातील आहे. स्टेफनी डेल ही प्यूटरे रिको मधील तर वेनेसा पॉन्स ही मेक्सिको मधील आहे. या तिनही विश्र्वसुंदरी इंस्टाग्रामद्वारे हा संवाद साधणार आहेत. यामध्ये या तिघीही सामाजिक मुद्यांवर चर्चा करतील. ज्यामध्ये शिक्षण, स्वच्छता सारख्या विषयांवर चर्चा करून जगाला या विषाणूशी लढण्यासाठी एकत्र येणं किती गरजेचे आहे हे सांगणार आहेत. याशिवाय मानसिक आरोग्य सारख्या विषयावरही त्या चर्चा करणार आहेत.  

मानुषी कोरोना विषाणूची जनजागृती करण्यासाठी हरियाणा आणि युनिसेफ इंडिया यांच्यासोबत जोडलेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR Live : मुंबई इंडियन्सने १४ वर्षांचा 'शाप' संपवला! IPL मधील सर्वात मोठा विजय मिळवला; रोहित, रिकल्टनची मॅच विनिंग खेळी

कोल्हापूरची अमृता पुजारी महिला महाराष्ट्र केसरी; वेदिकाला अस्मान दाखवत जिंकली चांदीची गदा अन् कार

अपहरणकर्त्यांचा कॉल ‘तुमचा मुलगा आमच्या ताब्यात, ५० लाख द्या, पोलिसांत गेल्यास मुलाला ठार मारु’; सोलापूर पोलिसांच्या ‘एलसीबी’ची १४ तासांची मेहनत अन्‌...

MI vs KKR Live: रोहित शर्माची IPL इतिहासातील वेगवान फिफ्टी! ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, 'फॅब फोअर'च्या पंक्तित बसला

Land Survey: भूमापन प्रक्रिया होणार वेगवान! फडणवीस सरकारने घेतला मोठा निर्णय; जमीन मोजणीसाठी नवी योजना लागू

SCROLL FOR NEXT